नवी दिल्ली, 06 मार्च : विमानात काही खराबी झाल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील. असाच एक प्रकार एअर इंडियाच्या विमानात घडला आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-फ्रँकफर्टच्या विमानात एअर प्रेशर कमी झाल्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.
दिल्लीहून फ्रँकफर्टला जाण्यासाठी विमानाने उड्डाण केलं. पण काही वेळातचं एअर प्रेशर कमी झालं. त्यामुळे विमानातील प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. यावर सुरक्षेसाठी विमान पुन्हा दिल्लीला परत बोलवण्यात आलं. दरम्यान, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
याआधीदेखील एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत ज्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांआधी एअर इंडियाच्या विमानातील जेवनात झुरळ सापडल्याचीही घटना समोर आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
Cabin decompression on Air India Delhi to Frankfurt flight(Boeing 787) at 20,000 feet. Aircraft took off today at 1:35 pm and returned to Delhi from Rajasthan airspace at around 4 pm. Around 191 people were onboard, all safe pic.twitter.com/Hn6ADzjPob
— ANI (@ANI) March 6, 2019
एअर इंडियामधील एका प्रवाशाच्या जेवनात झुरळ सापडलं होतं. तर एकदा एअर इंडियाच्या दिल्ली-अमृतसर फ्लाईटमध्ये हवामान खराब असल्यामुळे विमान खूप हलत होतं. एका प्रवाशानं सीटबेल्ट लावला नसल्यामुळे त्याचं डोकं छतावर आदळलं आणि त्याला गंभीर इजा झाली होती.
विशेष म्हणजे एका खिडकीची आतल्या बाजूची काचही तुटली पण बाहेरच्या काचेला काही झालं नाही. त्यामुळे आतला हवेचा दाब कमी झाला नाही, आणि म्हणूनच प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला नव्हता.
कोयते घेऊन फिरताय गुंड, पिंपरीतला गुंडाराजचा VIDEO