LIVE : Air India Express Crash केरळला विमान अपघात; पायलटसह 14 ठार, 123 जखमी

LIVE : Air India Express Crash केरळला विमान अपघात; पायलटसह 14 ठार, 123 जखमी

दुबईहून केरळकडे येणारं IX 1344 हे विमान अपघातग्रस्त झालं आहे. विमानात 170 प्रवासी असल्याचं समजतं.

  • Share this:

कोझिकोड 7 ऑगस्ट: केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. हे विमान रनवे वरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं आहे. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. 'वंदे भारत मिशन'च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं.

सध्या हाती आलेल्या बातमीनुसार, वैमानिकासह 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. 32 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

विमान धावपट्टीवर उतरत होतं, तेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता. केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. धावपट्टीवरून विमान घसरलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे.

नुकत्याच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, कोझिकोड विमान अपघातात 14 जण ठार झाले आहेत. 123 जण जखमी आहेत तर 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती मलापुरमच्या अधीक्षकांनी ANI ला दिली.

14 dead, 123 injured and 15 seriously injured in Kozhikode plane crash incident at Karipur Airport: Malappuram SP

कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यात इथे पाऊस होता. त्यामुळे कदाचित पायलटला अंदाज आला नसावा. त्यामुळे 30 फूट खाली ते घसरलं आणि त्यातून हा अपघात झाला.

केरळमध्ये कसा झाला भयंकर विमान अपघात? घटनास्थळावरील EXCLUSIVE PHOTOS

विमान लँड होत असताना धावपट्टीपासून काही अंतरावर ते घसरले. कोझिकोडमध्ये गेले 24 तास प्रचंड पाऊस पडतो आहे. या पावसामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

NDRF च्या टीम विमानतळाकडे रवाना झाल्या आहेत. शेकडो अँब्युलन्सही अपघातस्थळी दिसत आहेत.

लँडिंग करतांना विमानाचे झाले दोन तुकडे, विमानतळावर घडला थरार!

दिवसभरात केरळला हा दुसरा धक्का बसला आहे. मुसळधार पावसानं इडुकी जिल्ह्यात सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळल्याने एका क्षणात डोळ्यादेखत अख्खी वस्ती जमीनदोस्त झाली. जवळपास 80 हून अधिक मजूर राहात असणाऱ्या ठिकाणी मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. या भूस्खलनात 80 हून अधिक मजूर दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 7, 2020, 8:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading