Home /News /national /

Air Indiaकडून अलर्ट! 30 जूनपर्यंत 'या' मार्गावरील सर्व विमानांचं उड्डाण रद्द

Air Indiaकडून अलर्ट! 30 जूनपर्यंत 'या' मार्गावरील सर्व विमानांचं उड्डाण रद्द

जगभरात फोफावणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे कंपनीने 3 महिन्यांसाठी विमानांचं उड्डाण रद्द केलं आहे.

    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी: एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना समस्येचा सामना करावा लागू शकतो मात्र प्रवाशांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. एअर इंडिया कंपनीने भारतातून चीनला जाणारी सगळी विमानं 30 जूनपर्यंत रद्द केली आहेत. कोरोना व्हायरसचा धोका आता फक्त चीनच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. कोरोना व्हायरसची लागण होण्याचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळे उद्भवणारे धोके लक्षात घेऊन कंपनीने 30 जूनपर्यंत चीनला जाणारी विमानं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 3 महिन्यांसाठी म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणतंही विमान भारतातून चीनला जाणार नाही असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. शांघाई आणि हॉकाँगला जाणारी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. भारतातून हॉकाँगसाठी एक विमान रोज जातं मात्र पुढचे तीन महिने हे उड्डाण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तर दिल्ली ते शंघाई आठवड्यातून 6 वेळा विमानाचं उड्डाण होतं तेही रोखण्यात आलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोना व्हायरस असल्याचं सांगितलं जात आहे. कोची (MI 462) आणि कोची-सिंगापूर (MI 461) मार्गावरील विमानं 18 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहेत. तर सिंगापूर- मुंबई (SQ 426)मार्गावरील विमानाचं उड्डाण 28 मार्चला तर आणि मुंबई सिंगापूर मार्गावरील विमानाचं उड्डाण 22, 29 मार्चसाठी रद्द करण्यात आलं आहे. हेही वाचा-बैठ जाओ चाचा! अभिनेत्री स्वरा भास्कर असं नेमकं कोणाला म्हणाली? कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आता 850हून अधिक नव्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा-ठाकरे सरकारला मोठा धक्का, राज्यपालांनी फेटाळली महत्त्वाची शिफारस
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Air india, Air india flights, Air india plane, China, China airport, Coronavirus, Delhi

    पुढील बातम्या