Inspiration Story: एअर हॉस्ट्रेस आईची ‘अविस्मरणीय’ निवृत्ती, शेवटच्या दिवशी मुलीनेच उडवलं विमान

Inspiration Story: एअर हॉस्ट्रेस आईची ‘अविस्मरणीय’ निवृत्ती, शेवटच्या दिवशी मुलीनेच उडवलं विमान

विमानात अनोख्या पद्धतीने समारोप देण्यात आला. विमानात त्यांच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, ०१ ऑगस्टः त्या एअर हॉस्ट्रेस निवृत्त होणार होत्या. त्यांनी तब्बल ३८ वर्ष एअर हॉस्ट्रेस म्हणून नोकरी केली होती. आतापर्यंत अनेक पायलटसोबत काम केले होते. पण तरीही त्यांची निवृत्तीच्या दिवशीची फ्लाईट जास्त खास होती. नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्यांची मुलगीच पायलट म्हणून विमान उडवत होती. ही गोष्ट आहे एअर इंडियाची पायलट आश्रिता चिंचळकर आणि तिच्या आईची. माय- लेकी जेव्हा एकाच फ्लाइटमध्ये होत्या तेव्हा फक्त त्या दोघींसाठी तो अविस्मरणीय क्षण नव्हता तर संपूर्ण क्रू मेंबर आणि प्रवाशांसाठी तो एक भावूक क्षण होता.

Loading...

विमान उडवण्यापूर्वी आश्रिताने ट्विट करत म्हटले होते की, 'आज या विमानाची पायलट होण्याची संधी मिळाली यासाठी मी फार नशिबवान आहे. एअर इंडियामध्ये एअर हॉस्ट्रेस म्हणून माझ्या आईच्या शेवटच्या दिवशी विमानाची पायलट मी असावी, अशी माझ्या आईची इच्छा होती. ३८ वर्षांच्या नोकरीनंतर ती आज निवृत्त होत आहे. तिचा हा वारसा मी पुढे सुरू ठेवेन.' एअर इंडियानेही आश्रिताच्या या ट्विटला उत्तर देत ट्विट केले की, आश्रिता तुला आणि तुझ्या आईला आजच्या फ्लाईटसाठी शुभेच्छा. जेव्हा त्या बॅटन तुझ्या हातात देतील तेव्हा तुला अभिमानाने आपल्या प्रवाशांची सेवा करण्याची संधी मिळेल. हा वारसा खरंच पुढे चालत राहिल.

आश्रिताने आईच्या निवृत्तीआधीही एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये ती म्हणाली की, 'उद्या माझी आई निवृत्त होत आहे. तिने एअर इंडियामध्ये एअर हॉस्ट्रेस म्हणून ३८ वर्ष नोकरी केली. उद्या तिच्या शेवटच्या फ्लाइटला मी पायलट असणार आहे.' यावेळी आश्रिताच्या आईला  विमानात अनोख्या पद्धतीने समारोप देण्यात आला. विमानात त्यांच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली. प्रवाशांनी एकत्र टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. त्यांनीही हात जोडून साऱ्यांनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार केला. यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...