एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी, लंडनला इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी, लंडनला इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाचं हे विमान मुंबईवरून अमेरिकेतल्या नेर्वाकला जात होता. ही धमकी आल्यानंतर या विमानाला जवळच्या विमानतळावरू उतरण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर ते लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर उतरविण्यात आलं.

  • Share this:

लंडन, 27 जून :  मुंबईवरून अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने या विमानाला लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर तातडीने उतरविण्यात आलं. विमान उतरविण्यात आल्यानंतर काही तासांसाठी हे विमानतळ बंद करण्यात आलं होतं. सुरक्षा दलांनी या विमानाची कसून तपासणी केली. मात्र त्यात काहीही आढळून न आल्याने विमानाला पुढच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

एअर इंडियाचं हे विमान मुंबईवरून अमेरिकेतल्या नेर्वाकला जात होता. ही धमकी आल्यानंतर या विमानाला जवळच्या विमानतळावरू उतरण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर ते लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर उतरविण्यात आलं होतं. तपासणीनंतर विमान सुरक्षीत असल्याचं स्पष्ट झाल्याने हे विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आलं.

विमानाला झालेल्या विलंबाबद्दल स्टॅन्स्टेड विमानतळावर प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितलीय. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. पण सुरक्षेसाठी तपासणी करणं गरजेचं होतं असं ट्विट विमानतळ प्रशासनाने केलं आहे.

निरव मोदीला दणका, बँक खाते सील

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींची चुना लावून पळालेल्या नीरव मोदीला स्वित्झर्लंड सरकारनं मोठा दणका दिला आहे. स्वित्झर्लंड सरकारनं नीरव मोदीची 4 बँक खाती सिल केली आहेत. त्यामुळे आता या बँक खात्यांवरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा नीरव मोदीला करता येणार नाही. नीरव मोदीच्या 4 बँक खात्यांमध्ये 6 मिलियन डॉलर पैसे होते. सध्या नीरव मोदी लंडनमध्ये लपून बसला असून त्याला वेस्टमिनस्टर पोलिसांनी अटक केली आहे. नीरव मोदीनं जामिनासाठी केलेला अर्ज आतापर्यंत चार वेळा फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील मदत केली होती. त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

First published: June 27, 2019, 4:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading