Home /News /national /

ICU मध्ये आइसक्रीम खाल्ल्यानं हवाई सुंदरीचा मृत्यू; हॉटेलमध्ये भाच्याचाही संदिग्धावस्थेत आढळला मृतदेह

ICU मध्ये आइसक्रीम खाल्ल्यानं हवाई सुंदरीचा मृत्यू; हॉटेलमध्ये भाच्याचाही संदिग्धावस्थेत आढळला मृतदेह

Crime in Delhi: एका हवाई सुंदरीनं आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना आइसक्रीम खाल्ल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 05 जुलै: हात आणि पायात तीव्र वेदना होऊन गुप्तांगातून ब्लीडिंग झाल्यानं रोजी संगमा नावाच्या हवाई सुंदरीला 24 जून रोजी गुरुग्राम येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती जास्त खराब होत असल्यानं डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. याठिकाणी हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा  होतं होती. पण आयसीयूमध्ये आइसक्रीम खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. रोजी संगमा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाचा सॅमुअल संगमा यांनी एक व्हिडीओ शेअर करत रुग्णालयावर विविध आरोप केले. डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांना आइसक्रीम खाऊ घातल्यानं त्यांचा मृत्यू झाला असून याला डॉक्टरचं जबाबदार असल्याचा आरोप मृत महिलेचा भाचा सॅमुअल संगमा यानं केला. यामुळे त्याची रुग्णालयातील डॉक्टरांशी धक्काबुक्कीही झाली. व्हिडीओ बनवल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मृत महिलेचा भाच्याला मारहाण करत रुग्णालयाबाहेर काढलं. व्हिडीओ बनवून न्यायासाठी लढण्याची भाषा करणाऱ्या सॅमुअल संगमा याचा दिल्लीतील हॉटेलमध्ये संदिग्धावस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हेही वाचा-पुण्यात साऊथ फिल्मचा थरार; टोळक्यानं काठी, तलवारीनं वार करत दोघांना दगडानं ठेचलं एकीकडे हवाई सुंदरी असणाऱ्या रोजी संगमा यांचा रुग्णालयात आइसक्रीम खाऊन मृत्यू तर त्यांचा भाचा सॅमुअल संगमा यांचा हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सॅम्युअलच्या मृत्यूपूर्वी त्यानं 25 जून रोजी सकाळी साडेपाच वाजता आपल्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला होता. तसेच आपल्या मावशीला न्याय मिळवून देणार, असंही त्यानं आपल्या वडिलांना ठणकावून सांगितंल होतं. त्यानंतर संबंधित हॉटेलमध्ये सॅमुअलचा संदिग्धावस्थेत मृतदेह आढळला आहे. सॅमुअल हा मुळचा मेघालयातील रहिवासी असून तो आपल्या मावशीसोबत दिल्लीत भाड्यानं घर घेऊन राहत होता. हेही वाचा-आधी दुचाकीला बांधून 400मीटर फरफटलं मग झाडाला बांधून..; तरुणाचा फिल्मी स्टाइल खून त्यामुळे सॅमुअल यांच्या वडिलांनी मेव्हुणी रोजी संगमा आणि मुलगा सॅम्युअल संगमा यांना न्याय मिळवून देण्यासाठी मेघालय सरकार आणि केंद्रसरकारकडे मदतीची याचना केली आहे. या घटना उघडकीस आल्यानंतर ईशान्य भारतात तीव्र पडसाद उमटत आहेत. सॅम्युअलसोबत धक्काबुक्की झाल्याची कबुली रुग्णालय प्रशासनांकडून देण्यात आली आहे. पण सॅम्युअलला कोणत्याही प्रकारची मारहाण न केल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं आहे. त्याचबरोबर मृत महिलेनं स्वतःच्या मर्जीनं आइसक्रीम खाल्ल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Crime news, Death, Delhi, India, Shocking news

    पुढील बातम्या