विशाखापट्टनम 20 नोव्हेंबर : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी समोर आलेल्या माहितीनुसार अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली. यात नदीमध्ये दहा लोक अडकले. हे लोक मदतीची मागणी करत होते. अशात भारतीय वायुसेनेच्या एमआय १७ विमानाच्या मदतीनं या सर्वांना बाहेर काढण्यात आलं (Flood Rescue Operation).
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. इथे अनंतपूर जिल्ह्यातील चितत्रावाती नदीची पाणीपातळी अचानक वाढली. पाण्याची पातळी इतकी वाढली की हे पाणी पुलाच्या वरूनही वाहू लागलं. याचवेळी एका कारमधून चार लोक हा पुल पार करत होते. मात्र ते पुराच्या पाण्यात अडकले. पाहता पाहता ही कार वाहून गेली. यादरम्यान लोक मदतीसाठी मागणी करू लागले. त्यांना वाचवण्यासाठी सहा स्थानिक लोक जेसीबी घेऊन पोहोचले. मात्र पुराच्या पाण्यात जेसीबीही अडकला. अशात हे दहा लोक मदतीसाठी ओरडू लागले.
नदीच्या काठावर उभा असलेल्या काही लोकांनी या लोकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून चित्रावती नदीत अडकलेल्या १० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
#WATCH | Today, Indian Air Force's Mi-17 helicopter evacuated ten people stuck in the rising waters of Chitravati river in Ananthapur district, Andhra Pradesh, in difficult weather conditions.
(Video: IAF) pic.twitter.com/jT4qMBgxFl — ANI (@ANI) November 19, 2021
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाबामुळे आंध्र प्रदेशातील अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. नेल्लोर, चित्तूर, कडप्पा जिल्ह्यात गेल्या दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे, अनेक सखल भागात पूरसदृश परिस्थिती कायम आहे.
चित्तूर, कडप्पा आणि नेल्लोर जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. या जिल्ह्यांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे, नद्यांचे कालवे फुटले आहेत. रस्तेही जलमय झाले आहेत. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक भागात रस्ते खचले असून त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास होत आहे. दुसरीकडे प्रशासनाचे पथक बचावकार्य करत आहे. संवेदनशील भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.