News18 Lokmat

‘जैश’च्या तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी स्पाइस - 2000 बॉम्बची चाचणी

बालाकोटमधल्या जैश च्या तळांवर हल्ला करण्यासाठी भारतीय हवाई दलाने मिराज लढाऊ विमानं वापरली होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 04:12 PM IST

‘जैश’च्या तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी स्पाइस - 2000 बॉम्बची चाचणी

नवी दिल्ली 5 मार्च :भारतीय हवाई दलाने सुखोई – ३० या लढाऊ विमानातून स्पाइस २००० बॉम्बहल्ल्याचा सराव केला आहे. त्यामुळे भारताची दहशतवादविरोधी मोहीम आणखी तीव्र होणार, अशीच चिन्हं आहेत.पाकिस्तानमधल्या बालाकोटमधल्या ‘जैश’ च्या तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर आता दहशतवादाविरोधातली ही मोहीम सुरूच राहील, असं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे. या मोहिमेसाठी हवाई दलाने काही चाचण्याही केल्या आहेत. हवाई दलाने सुखोई -३० विमानात स्पाइस 2000 बॉम्बची चाचणी करून पाहिली आहे.

स्पाइस 2000 हा बॉम्ब’ जैश ए मोहम्मद’ चा खात्मा करण्यासाठी वापरण्यात आला होता. बालाकोटमधल्या ‘जैश’ च्या तळांवर हल्ला करण्यासाठी भारतीय हवाई दलाने मिराज लढाऊ विमानं वापरली होती. या हल्ल्यात ‘जैश’चे अनेक अतिरेकी मारले गेले होते. या हल्ल्यानंतर हवाई दलाचं मनोबल वाढलं आहे. त्यामुळे दहशतवाविरुद्धच्या मोहिमेला यश येणार, असा विश्वास सैन्यदलाला आहे.

भारताचा हवाई हल्ला आणि भारत – पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सैन्यदलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे युद्ध पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध नसून दहशतवादाविरोधात आहे हे भारताने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य करून त्यावर हवाई हल्ले करण्याचा भारताचा पवित्रा आहे.

भारताने २६ फेब्रुवारीला केलेला हवाई हल्ला हा ‘पायलट प्रोजेक्ट’ होता. यापुढेही अशा आणखी मोहिमा आखल्या जातील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केलं आहे. त्यानंतर भारताच्या सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...