Balakot : 80 टक्के बाँबनी साधलं लक्ष्य; हवाई दलाने सरकारकडे फोटोंसह सोपवले Air Strike चे पुरावे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट इथे केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे भारतीय हवाई दलाने सरकारकडे सुपूर्द केले आहेत. फोटोंसह दिलेल्या या पुराव्यांवरून असं स्पष्ट होतंय की, 80 टक्के बाँब ठरलेलं लक्ष्य साध्य केलं आहे.

  • Share this:

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातल्या बालाकोटा भागात असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यात नेमकं किती नुकसान झालं याबद्दल उलट-सुटल माहिती पुढे येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने केलेल्या बाँब हल्ल्यातले 80 टक्के बाँब बरोब्बर निशाण्यावर पडले. यासंबंधीचे पुरावे हवाई दलाने सरकारकडे सुपूर्द केले आहेत.

इंडिया टुडे टीव्हीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतीय हवाई दलाने या एअर स्ट्राईकसंबंधातली सगळी माहिती आणि फोटोंसह कागदपत्रं केंद्र सरकारकडे दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हवाई दलाने केंद्र सरकारकडे 12 पानी रिपोर्ट पाठवला आहे, असं सूत्रांनी सांगितलं. यानुसार बहुतेक सर्व बाँब बरोबर लक्ष्यावर पडले आहेत.

आता हवाई दलाने दिलेले हे पुरावे सार्वजनिक करायचे की नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेईल.

इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार Spice 2000 हे बाँब वापरले गेले. याचा वापर बरोबर निशाणा साधण्यासाठी केला जातो. मिराज 2000 या लढाऊ विमानातून हा बाँबहल्ला करण्यात आला.

14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमध्ये पुलावामा इथे CRPF च्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. यात 40 जवान मृत्युमुखी पडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या