'मी चांगला मुलगा आणि भाऊ होऊ शकलो नाही' : Air Force च्या जवानाने रायफलनेच झाडून घेतली गोळी

'मी चांगला मुलगा आणि भाऊ होऊ शकलो नाही' : Air Force च्या जवानाने रायफलनेच झाडून घेतली गोळी

भारतीय हवाई दलातील जवानानं गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

  • Share this:

चंदीगड, 08 जून : Indian Air force IAF मध्ये लान्स नायक पदावर असणाऱ्या एका जवानाने आपली ड्युटी संपवल्यानंतर पुन्हा ब्रँचला येत सर्व्हिस रायफलने स्वतःच्या कानशिलावर गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून बाहेर तैनात असलेले भारतीय वायुदलाचे सुरक्षा रक्षक धावत आत आले. तेव्हा त्यांना या जवानाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मोहन सिंह असं आत्महत्या केलेल्या एअर फोर्स जवानाचं नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचं समजतं. दोनच महिन्यांपूर्वी मोहन सिंह यांचं लग्न झालं होतं.

सर्व्हिस रायफलनं गोळी झाडून आत्महत्या करण्याअगोदर मोहन सिंहनी चिठ्ठी लिहिली होती. 'मी चांगला मुलगा आणि भाऊ होऊ शकलो नाही. मला माफ करा', अशा अर्थाचा मजकूर त्यात होता. आत्महत्येमागे नेमकं कोणतं कारण आहे आणि चिठ्ठीत मोहन यांनी असं का लिहिलं याबद्दल जवानाची पत्नी काही सांगू शकलेली  नाही. मोहन सिंह हे भारतीय हवाई दलामध्ये लान्स नायक पदावर कार्यरत होते. मोहन सिंह यांची 2011 मध्ये वायुदलात नोकरी सुरू केली. त्या वेळी त्यांची कर्नाटकातील बंगळुरूला त्यांची नियुक्ती झाली होती. गेल्या वर्षीच त्यांचं पोस्टिंग हरयाणातल्या सिरसा एअरबेसवर करण्यात आलं होतं.

दोनच महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

2011मध्ये मोहन सिंह भारतीय हवाई दलात रूजू झाले होते. गेल्या वर्षी त्यांचं पोस्टिंग हे सिरसा एअर पोर्टवर करण्यात आलं होतं. यावर्षीच म्हणजे 2019च्या मार्चमध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यांनी नेमक्या काय कारणासाठी आत्महत्या केली, हे अद्याप उघड झालेलं नाही. एअर फोर्सचे उच्चाधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. सकाळी नेहमीसारखे ते ड्युटीवर तैनात होते. दुपारी 2 वाजता ड्युटी संपल्यानंतर त्यांनी सर्व्हिस रायफलने आत्महत्या केली. पत्नीनं देखील मोहन सिंह यांनी आत्महत्या का केली? याबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं.

चिठ्ठीत मागितली माफी

मोहन सिंह यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्यानं त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मोहन सिंह यांनी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला माफ कर. मी चांगला मुलगा आणि भाऊ झालो नाही असं म्हटलं आहे. सध्या या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोहन सिंह यांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध सध्या घेतला जात आहे.

SPECIAL REPORT: वसईतील 'या' भन्नाट रिक्षाची का होते आहे चर्चा?

First published: June 8, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading