हवाई दलातील जवानाची गोळी झाडून आत्महत्या; चिठ्ठीत म्हणाला...

Indian Air Force : भारतीय हवाई दलातील जवानानं गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 03:49 PM IST

हवाई दलातील जवानाची गोळी झाडून आत्महत्या; चिठ्ठीत म्हणाला...

चंदीगड, 08 जून : हवाई दलातील जवानानं आपल्या सर्विस रायफलनं गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मोहन सिंह हे भारतीय हवाई दलामध्ये लान्स नायक पदावर कार्यरत होते. मोहन सिंह मुळचे कर्नाटकातील बंगळूरूमधील रहिवासी आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला माफ करा. मी चांगला मुलगा आणि भाऊ नाही होऊ शकलो असं म्हटलं आहे. मोहन सिंह यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

2019मध्ये झालं होतं लग्न

2011मध्ये मोहन सिंह भारतीय हवाई दलात रूजू झाले होते. गेल्यावर्षी त्यांचं पोस्टिंग हे सिरसा एअर पोर्टवर करण्यात आलं होतं. यावर्षीच म्हणजे 2019मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. दुपारी 2 वाजता ड्युटी संपल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.

गोळी झाडून मोहन सिंह यांनी आत्महत्या केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मोहन सिंह रक्ताच्या थारोळात पडलेले होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मोहन सिंह यांनी आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलिस घेत आहेत. पत्नीनं देखील मोहन सिंह यांनी आत्महत्या का केली? याबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं.

Loading...


कॅबप्रमाणे पाणबुडी देखील करू शकता बुक; उबर देतंय ऑफर

चिठ्ठीत मागितली माफी

मोहन सिंह यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्यानं त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मोहन सिंह यांनी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला माफ कर. मी चांगला मुलगा आणि भाऊ झालो नाही असं म्हटलं आहे. सध्या या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोहन सिंह यांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध सध्या घेतला जात आहे.


SPECIAL REPORT: वसईतील 'या' भन्नाट रिक्षाची का होते आहे चर्चा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...