'बालाकोट'ची मोहिम फत्ते करणाऱ्या बॉम्बपेक्षाही शक्तिशाली अस्त्र हवाई दलाकडे येणार

'बालाकोट'ची मोहिम फत्ते करणाऱ्या बॉम्बपेक्षाही शक्तिशाली अस्त्र हवाई दलाकडे येणार

या बॉम्बच्या नवी आवृत्ती अधिक शक्तिशाली असून त्यात इमारत आणि बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 08 मे : भारतीय  हवाईदलाने बालकोटच्या हवाई हल्ल्यात ज्या बॉम्बचा उपयोग केला त्या बॉम्बपेक्षाही अधिक शक्तिशाली असणारे नवे संहारक बॉम्ब भारतीय हवाई दलात दाखल होणार आहेत. बालाकोटवरच्या हल्ल्यात 'स्पाईस-2000' या बॉम्बचा वापर करण्यात आला होता. आता या बॉम्बची पुढची अत्याधुनिक आवृत्ती हवाईदल घेणार आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या बालाकोट इथं जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत तो तळ उद्धवस्त केला होता. या कारवाईत 'स्पाईस-2000' या बॉम्बचा वापर करण्यात आला होता.काय आहे 'स्पाईस-2000'?

'स्पाईस-2000' हा अतिशय शक्तिशाली कॅमेऱ्याने युक्त असलेला बॉम्ब आहे. अचुक नेम साधत टार्गेट उध्वस्त करण्याची या बॉम्बमध्ये ताकद आहे. टार्गेटच्या जवळ गेल्यावर त्याचा फोटो घेऊन ते नेमकं टार्गेट आहे की नाही याचीही त्यात खात्री होते. इमारत उद्धवस्त न करता त्यातून आत जाऊन निशाणा साधण्याची खास बाब त्यात आहे. त्यामुळे सहसा नेम चुकत नाही. मनुष्यहानीही प्रचंड प्रमाणात त्यात होते.

असं आहे 'स्पाईस-2000'चं आधुनिक रुप

'स्पाईस-2000' ही इस्त्रायलची निर्मिती आहे. या बॉम्बच्या नवी आवृत्ती अधिक शक्तिशाली असून त्यात इमारत आणि बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे. त्यामुळे शत्रूची अधिक हानी होऊ शकते. पर्वतीय भाग आणि दाट जंगलांमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांचे तळ यामुळे नष्ट करता येऊ शकतात.

लष्कराला 300 कोटींपर्यंत तातडीची खरेदी करण्याचे अधिकार आहेत. त्याच पैशातून ही खरेदी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. हे बॉम्ब हवाईदलाला मिळाले तर त्यांची मारक क्षमता आणखी वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 08:06 PM IST

ताज्या बातम्या