मराठी बातम्या /बातम्या /देश /plane crash : भारतीय हवाई दलाची 3 फायटर जेट विमानं कोसळली

plane crash : भारतीय हवाई दलाची 3 फायटर जेट विमानं कोसळली

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे.

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे.

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Rajsamand, India

राजस्थान, 28 जानेवारी : राजस्थानमध्ये भारतीय हवाई  दलाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. भरतपूरमध्ये 1 फायटर जेट विमान कोसळले आहे. तर मध्य प्रदेशमधील मुरैनाजवळून एक सुखोई-30 आणि मिराज 2000 विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. एकाचवेळी 3 फायटर जेट विमानं कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजस्थानमध्ये आज सकाळी भरतपूर येथील सेवर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक फायटर जेट विमान कोसळले. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर आग लागली. स्फोट झाल्यामुळे विमानाचे तुकडे तुकडे झाले. सुदैवाने हे विमान गावातील एका शेतात कोसळले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

(राजस्थानमध्ये फायटर जेट कोसळून अपघात; ...तर घडली असती मोठी दुर्घटना)

तर दुसरी घटना, मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. सुखोई-30 आणि मिराज 2000 या विमानांनी ग्वालियर हवाई तळावरून उड्डाण भरले होते. हवाई दलाचा सराव सुरू होता. पण अचानक दोन्ही विमानांची धडक झाली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघात प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. सुखोईमध्ये 2 पायलट आणि मिराजमध्ये एक पायलट होता.

दोन्ही पायलट सुरक्षित आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर हे तिसऱ्या पायलटला घेण्यासाठी रवाना झाले आहे. एक फायटर जेट हे मुरैना जिल्ह्यातील पहाडगड विकासखंडच्या जंगलात कोसळले आहे. लोकांना आकाशात विमानांना आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर वेगाने ही विमानं खाली कोसळली. दोन्ही विमानाच्या पायलटने मोकळ्या जागेत विमानांचं क्रॅश लँडिंग केलं. घटनास्थळी मदत कार्य पोहोचले आहे.

First published:

Tags: Rajasthan