'जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', हवाई दलाच्या प्रमुखांचा चीनला थेट इशारा

'जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', हवाई दलाच्या प्रमुखांचा चीनला थेट इशारा

चीनने केलेल्या दाव्यानंतर आता हवाई दलाच्या प्रमुखांनी थेट इशारा दिला आहे.

  • Share this:

हैदराबाद, 20 जून : लडाखमधील गलवात खोऱ्यातील झालेल्या संघर्षानंतर आता चीनकडून तो भाग आमचाच असल्याचा दावा केला जात असतानाच हवाई दलाचे प्रमुखांनी चीनला इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 20 शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा सूचक इशारा हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस भदौरिया यांनी चीनला दिला आहे.

हैदराबाद इथे भारतीय हवाई दल अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस भदौरिया यांनी पदवीदान समारंभावेळी संबोधित करताना लडाखमधील संघर्षावर बोलत होते.

यावेळी हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस भदौरिया यांनी शहीद कर्नल संतोष बाबू आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षादरम्यान आपल्या सैनिकांनी शौर्य दाखवले. आम्ही कोणत्याही किंमतीत देशाच्या सीमांचे रक्षण करू असंही यावेळी त्यांनी सूचक इशारा चीनला दिला आहे.

नुकताच चीननं गलवान खोरं आमचा भाग असल्याचा दावा केला. भारतीय सैन्यानं सीमारेषा ओलांडल्याचा आरोपही चीननं भारतीय सैन्यदलावर केला आहे. तर भारतीय सैन्य आपल्या सीमा रेषेचं संरक्षण कोणत्याही परिस्थित करेल आणि येणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा इशाराही आर. के. एस भदौरिया यांनी दिला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 20, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या