Air Strikeमध्ये किती दहशतवादी मेले ते मोजणं आमचं काम नाही - वायुदल प्रमुख

Air Strikeमध्ये किती दहशतवादी मेले ते मोजणं आमचं काम नाही - वायुदल प्रमुख

पाकिस्तानविरोधातील कारवाई अद्याप संपलेली नाही - वायुदल प्रमुख

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि शेजारील देश वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. Air Strike वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना भारतीय वायुदलाचे प्रमुख बी.एस.धानोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ' एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले, त्याची संख्या मोजणे वायुदलाचे काम नाही. आम्हाला जे टार्गेट दिले होते, ते आम्ही पूर्ण केले', असे बी.एस. धनोआ यांनी सांगितले.

यावेळेस वायुदल प्रमख धानोआ यांनी पाकिस्तानला थेट इशारा देत म्हटलं की, 'कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देताना वायुदल क्षणाचाही विचार करणार नाही. गरज भासल्यास भारतीय वायुदल पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाई करेल. तसंच बॉम्ब जंगलात पडले नसते, तर पाकिस्तानने प्रतिहल्ला केला नसता.'

'हल्ल्यासाठी अपग्रेडेड मिग 21 विमान वापरले'

वायुदल प्रमुख धनोआ यांनी पुढे असंही सांगितले की, एअर स्ट्राईकदरम्यान वापरण्यात आलेले मिग 21 हे अपग्रेडेड विमान होते आणि शत्रू देशाला प्रत्युत्तर देण्याच्या वेळेस आमच्याकडे जे विमान उपलब्ध असेल, त्यावेळेस त्याचा वापर केला जाईल.

राफेल भारतात कधी दाखल होणार?

राफेल विमान करारावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच आता राफेल विमान भारतात नक्की कधीपर्यंत येऊ शकेल, याबाबतही वायुदल प्रमुख धानोआ यांनी माहिती दिली. 'राफेल ही लढाऊ विमानं साधारणपणे याच वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत दाखल होतील,' असे धानोआ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

'पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावे'

भारतावर हल्ला करताना पाकिस्तानने F-16 विमानांचा वापर केला याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, या विमानाचे काही तुकडे आमच्याकडे  आहेत, असे सांगत धानोआ यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर आणला.

'अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत'

वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. जोपर्यंत ते ठीक होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू राहतील. अभिनंदन सर्वच चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यास ते लवकरच आपल्या पदावर पुन्हा रूजू होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

पाकिस्तानविरोधात एअर स्ट्राईक केल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून वारंवार केली जात आहे.  माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरमदेखील म्हणाले की,  'भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

First published: March 4, 2019, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading