News18 Lokmat

'कोणत्याही ऑपरेशनसाठी अचानकपणे बोलावलं जाईल, त्यासाठी सज्ज रहा'

बी एस धनोआ यांनी वायुसेना प्रमुखपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुमारे 3 महिन्यानंतर म्हणजेच 30 मार्चला हे पत्र जवळपास 12 हजार अधिकाऱ्यांना पाठवलं आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 21, 2017 12:58 PM IST

'कोणत्याही ऑपरेशनसाठी अचानकपणे बोलावलं जाईल, त्यासाठी सज्ज रहा'

21 मे : सर्जिकल स्ट्राइकचा जोरदार झटका दिल्यानंतर आता कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची गोची झाली आहे. या सर्वांमुळे बिथरलेल्या पाकिस्तनकडून सतत दहशतवादी हल्ला आणि सीमेवर गोळीबार सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदल प्रमुख बी. एस. धन्वा यांनी वैयक्तिक पत्राद्वारे 12 हजार अधिकारी आणि जवानांना 'कोणत्याही ऑपरेशनसाठी अचानकपणे बोलावलं जाईल, त्यासाठी सज्ज रहा' असं आवाहन केलं आहे.

बी एस धनोआ यांनी वायुसेना प्रमुखपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुमारे 3 महिन्यानंतर म्हणजेच 30 मार्चला हे पत्र जवळपास 12 हजार अधिकाऱ्यांना पाठवलं आहे.

हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आपल्या पत्रात ‘सब-कन्व्हेंशनल थ्रेट’चा उल्लेख करत त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली आहे. पाकिस्तानने भारतासोबत सुरू केलेल्या छुप्या युद्धाबाबत हा शब्द वापरला जातो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हवाई दलाकडे आवश्यक असलेल्या संख्येत लढाऊ विमानं नाहीत. यामुळे मर्यादित साधनांच्या दृष्टीने सर्वांनी सज्ज राहावे, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

बी एस धनोआ यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या गोळीबाराकडे लक्ष वेधलं आहे.

Loading...

याआधी 1 मे 1950 रोजी तत्कालीन लष्करप्रमुख के एम करिअप्पा आणि 1 फेब्रुवारी 1986 रोजी लष्करप्रमुख के. सुंदरजी यांनी अशाच प्रकारचं पत्र लिहिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2017 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...