राफेल भारतात कधी दाखल होणार? हवाई दलाच्या प्रमुखांनी पहिल्यांदाच दिली माहिती

राफेल भारतात कधी दाखल होणार? हवाई दलाच्या प्रमुखांनी पहिल्यांदाच दिली माहिती

राफेल विमान भारतात नक्की कधीपर्यंत येऊ शकेल, याबाबत भारताच्या हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : राफेल विमान करारावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच आता राफेल विमान भारतात नक्की कधीपर्यंत येऊ शकेल, याबाबत भारताच्या हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी माहिती दिली आहे.

'राफेल ही लढाऊ विमानं साधारणपणे याच वर्षी सप्टेंबरपर्यंत दाखल होतील,' असं बिरेंदर सिंह धानोआ यांनी काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यामुळे मोठ्या वादानंतर राफेल विमानं भारतात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राफेलबाबत काय आहे पंतप्रधान मोदींचं म्हणणं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून जोरदार निशाणा साधला. आमचे सरकारच पहिले राफेल विमान उडवणार, असंही मोदी अमेठीत म्हणाले. राफेल विमान प्रकरणावरुन काँग्रेसला टार्गेट करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ही लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला. मग आमचे सरकार आहे आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

काय आहे राहुल गांधींचा आरोप?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी कंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

शिवसेनेला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? आमदार म्हणतात...

First published: March 4, 2019, 1:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading