मुंबईकडे येणाऱ्या विमानातच महिलेनं दिली बॉम्बस्फोटाची धमकी, पायलटला दिलेल्या चिठ्ठीत लिहिलं...

मुंबईकडे येणाऱ्या विमानातच महिलेनं दिली बॉम्बस्फोटाची धमकी, पायलटला दिलेल्या चिठ्ठीत लिहिलं...

कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाने 114 प्रवाशांसह उड्डाण केल्यानंतर एका महिलेनं आपण बॉम्बने विमान उडवून देऊ अशी धमकी दिली.

  • Share this:

कोलकाता, 13 जानेवारी : एअर एशियाच्या एका विमानाला उड्डाण केल्यानंतर पुन्हा लँडिंग करावं लागलं. एका महिला प्रवाशाने तिच्याकडे डिटोनेट बॉम्ब असल्याचा दावा केला आणि विमान हवेतच उडवून देऊन अशी धमकी दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकडे एअर एशियाचे विमान येत होते. 114 प्रवासी असलेल्या विमानाने रात्री 9.57 ला उड्डाण केलं. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच महिला प्रवाशाने केबिन क्रू मेंबरला एक चिठ्ठी दिली आणि ती पायलटला देण्यास सांगितली.

महिला प्रवाशाने दिलेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं की, माझ्या शरीरावर बॉम्ब बांधला आहे. त्याचा कधीही स्फोट करेन. महिलेची ही चिठ्ठी वाचल्यानंतर पायलटने एअर ट्राफिक कंट्रोलरला कळवलं. त्यानंतर त्याला पुन्हा विमानतळावर परतण्याचे आदेश देण्यात आले. विमानतळावर विमान उतरल्यानंतर महिलेला 11.46 मिनिटांना आयसोलेशन बेमध्ये घेऊन जाण्यात आलं.

एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला सीआयएसएफने ताब्यात घेतलं आहे. महिलेची पूर्ण तपासणी करण्यात आली मात्र तिच्याकडे काहीच आढळलं नाही. बॉम्बची धमकी देणाऱ्या महिलेचं नाव मोहिनी मंडल असल्याचं समजतं. ती कोलकात्यातील सॉल्ट लेक एरियामध्ये राहते.

वाचा : ऐकावं ते नवलच! नवरा रोज 7 तास अंघोळ करतो म्हणून बायकोनं दिला घटस्फोट

विमान उतरवल्यानंतर महिलेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला अटक केली. वैद्यकिय चौकशीत सांगण्यात आलं की, ती बेशुद्धावस्थेत होती. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तिच्या घरातील लोकांशी चर्चा केली जात असून ती मुंबईला का जात होती याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, महिलेला कोलकात्याला परत जायचे होते म्हणून तिने बॉम्बची धमकी दिली.

VIDEO : क्षणात उद्ध्वस्त झालं घराचं स्वप्न, आणखी एक गगनचुंबी इमारत जमीनदोस्त

Published by: Suraj Yadav
First published: January 13, 2020, 7:41 AM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading