तिहेरी तलाकवर कोणताही हस्तक्षेप नको-मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

तिहेरी तलाकवर कोणताही हस्तक्षेप नको-मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

  • Share this:

भोपाळ, 11 सप्टेंबर: तिहेरी तलाक रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं विरोध केला आहे. तिहेरी तलाकवर कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका पर्सनल लॉ बोर्डानं घेतली आहे.

भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तिहेरी तलाकवरील आक्षेप कमी करण्यासाठी मुसलमान पुरुषांचं प्रबोधन करणार असल्याचंही बोर्डाचे प्रवक्ते म्हणाले. पर्सनल लॉ बोर्डाकडून दहा सदस्यीय समिती गठित केली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढची रणनीती ठरवणार असल्याचं सांगण्यात आलंय.

First published: September 11, 2017, 8:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading