'मी का माफी मागू?' वादग्रस्त वक्तव्यांवरच्या प्रश्नांना वैतागून निघून गेले वारिस पठाण

'मी का माफी मागू?' वादग्रस्त वक्तव्यांवरच्या प्रश्नांना वैतागून निघून गेले वारिस पठाण

मी का माफी मागू? मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, असं म्हणत वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषणावरच्या प्रश्नांना बगल दिली. '15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत' अशी भाषा असलेल्या त्यांच्या चिथावणीखोर भाषणावरून वाद सुरू आहे.

  • Share this:

विवेक गुप्ता

मुंबई, 20 फेब्रुवारी : मी का माफी मागू? मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, असं म्हणत वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषणावरच्या प्रश्नांना बगल दिली. पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती वाढल्याने वैतागून ते अधिक काही न बोलता ते निघूनही गेले. "15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!" असं म्हणत मुस्लीम समुदायापुढे चिथावणीखोर भाषण करणाऱ्या माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर टीका होत आहे. कर्नाटकात गुलबर्गा इथल्या पठाण यांच्या भाषणाचा VIDEO माध्यमांमधून फिरत आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याची शक्यता असणारी वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी या भाषणात केली.

"इट का जवाब पत्थर से' हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या', अशी चिथावणीखोर भाषा वापरत MIM चे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं.  All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)चे नेते वारिस पठाण माजी आमदार आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदारसंघातून ते गेल्या विधानसभेत निवडून आले होते.

संबंधित - VIDEO '15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत', वारिस पठाण यांची चिथावणी

CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले, "ते म्हणतात आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!", अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली.

समोर उपस्थित समुदायाला उद्देशून ते म्हणाले,"आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!"

माफी मागण्यास नकार

आपल्या या वादग्रस्त भाषणावर माफी मागण्यास वारिस पठाण यांनी नकार दिला. आपण कुठलंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. घटनेच्या चौकटीत राहूनच हे भाषण केलं आहे. यात काही चुकीचं नाही. मी हिंदू शब्दाचा वापर केलेला नाही, असं ते म्हणाले.

"या देशात भाजपचे नेते खुलेपणानं 'गोली मारों गद्दारों को' असं सांगतात. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही", असंही ते म्हणाले. पत्रकार आणखी प्रश्न विचारायला लागल्यावर मात्र ते निघून गेले.

याच भाषणावरून उफाळलाय वाद

क्रीडा जगतात खळबळ, भारताच्या 2 खेळाडूंची गोळी मारून हत्या

'नाणार'वरून शिवसेनेत दुफळी, 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

First published: February 20, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading