S M L

#ExitPolls तेलंगणात असदुद्दीन ओवेसांचं काय होणार?

मुस्लिम मतांवर ओवेसींचा कायम डोळा असतो. पण एक विशिष्ट भाग सोडला तर इतर भागात ते प्रभाव दाखवू शकले नाही.

Updated On: Dec 7, 2018 09:35 PM IST

#ExitPolls तेलंगणात असदुद्दीन ओवेसांचं काय होणार?

महेश तिवारी, हैदराबाद 7 डिसेंबर : तेलंगणातल्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती बाजी मारणार हे स्पष्ट झालंय. तर आपल्या वक्तव्यानं कायम वादात असणारे असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ची ताकद मर्यादीतच राहणार हे स्पष्ट झालंय. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांपैकी AIMIM फक्त 07 जागा लढवत आहे. सध्या त्यांच्याकडे 07 जागा असून गेल्या निवडणुकीत त्यांनी 08 जागा लढवल्या होत्या.


कायम आक्रमक असणारे आणि मिस्लिमांच्या प्रतिष्ठेची बाजू घेणारे ओवेसा या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकणार नाहीत अशीच शक्यता आहे. तर आम्ही लढवलेल्या सर्व जागा जिंकू असा दावा असाद्दुद्दीन ओवेसी यांनी केलाय.

ओवेसी हे तेलंगणातले मोठे मुस्लिम नेते आहेत. ते मुसलमानांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात. जुन्या हैदराबादमध्ये असलेल्या सहा विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे.


Loading...

तेलंगणात 12.7% अल्पसंख्याक समुदाय आहे आणि राज्यातल्या 119 पैकी 40 ते 45  जागांवर अल्पसंख्याक मतांचा प्रभाव आहे. राजकीय निरिक्षकांच्या मते राज्यांच्यातल्या 29 विधानसभा मतदार संघात 15 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. तर एकूण 43 मतदार संघावर मुस्लिम मतांचा प्रभाव आहे.


याच मुस्लिम मतांवर ओवेसींचा कायम डोळा असतो. पण एक विशिष्ट भाग सोडला तर इतर भागात ते प्रभाव दाखवू शकले नाही. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचा काही भागात प्रभाव आहे.

तेलंगणाच्या निवडणुकीत मतांच्या ध्रुविकरणासाठी भाजपने ओवेसींशी छुपी युती केल्याचा आरोप झाला.


या निवडणुकीत काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाने एकत्र मिळून निवडणूक लढवली. मात्र टीआरएसचा प्रभाव जास्त असल्याने इतर कुठल्याच पक्षांची डाळ तिथे शिजणार नाही अशीच चिन्ह आहेत. तेलंगणाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री केसीआर यांच्या कुटूंबियाच्या राजकारणातल्या सहभागावरुन कांग्रेस आणि भाजपने केसीआर यांच्यावर टीका केली होती.


दुसरीकडे तेलंगणा राष्ट्र समिती भाजपची बाहुली असल्याचा आरोप कांग्रेसने केला होता. दरम्यान टीडीपी आणि कांग्रेसच्या युतीवरुन तेलंगणाच्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या भाषेने मर्यादा पार केल्याचं चिञ बघायला मिळालं.

एकीकृत आंध्र प्रदेशचे मुख्यमंञी असताना हैदराबाद शहराचा विकास केल्याचा दावा करत चंद्राबाबु नायडु यांनी केला.


त्यांनी हैदराबाद शहरात केलेल्या रोड शो वरुन तेलंगणा राष्ट्र समितीने चंद्राबाबु नायडुना अप्रत्यक्ष धमकावत आंध्रप्रदेशच्या निवडणुकीत यापुढे टीआरएस हस्तक्षेप करेल असा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत चार  प्रचार सभा घेतल्या.


मुख्यमंञी देवेंद्र फडणवीसाच्या जाहीर सभेत केसीआर यांच्या कुटूंबातली घराणेशाहीसह महाराष्ट्र तेलंगणा दरम्यानचा पाणी प्रश्न  समेटाने सोडवल्याचे मुख्यमंञ्यानी प्रचारसभेत सांगीतले होते.

VIDEO : लोकलमधून पडल्या दोन महिला; थोडक्यात बचावल्या..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 08:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close