नवी दिल्ली 10 ऑक्टोबर: AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. सर्व जगात भारतात मुसलमान सर्वाधिक समाधानी आहेत असा दावा भागवत यांनी केला होता. त्यावरून ओवीसींनी भागवतांवर निशाणा साधला आहे. संघाची विचारसरणी ही मुस्लिमांना दुय्यम नागरिक समजते. त्यामुळे आम्ही किती समाधानी आहोत किंवा नाही हे त्यांनी सांगू नये असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.
भागवत यांनी ‘साप्ताहिक विवेक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली होती. संघ हा कधीच कुणाच्या विरोधात नव्हता. या देशात राहणारे आणि मातृभूमीवर प्रेम करणारे सर्व हे आमचेच आहेत असंही भागवतांनी म्हटलं होतं.
ओवेसी म्हणाले, या देशात अल्पसंख्यकांनी बहुसंख्यकांच्या दयेवर राहावं असं भागवतांना वाटतं का? या देशात घटनेने जो अधिकार दिला आहे तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे एवढच आमचं म्हणणं आहे असंही ओवेसींनी म्हटलं आहे.
आनंदाचं परिमाण काय आहे? संघ हा आम्हाला कायम कसं राहावं आणि कायम करावं असे उपदेशाचे डोज पाजत असतो. मात्र त्यांच्या या प्रवचनांची आम्हा गरज नाही असंही ओवेसेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते भागवत?
भारत हा सगळ्यांचा देश असून इथे राहण्याचा सर्वांना अधिकार आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. साप्ताहिक विवेकला दिलेल्या एका खास मुलाखतीत ते बोलत होते. केवळ स्वार्थी लोकच कट्टरतावाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देतात, कारण त्यातच त्यांचा स्वार्थ असतो असंही त्यांनी सांगितलं.
मोहन भागवत म्हणाले, जेव्हा केव्हा भारतीय संस्कृतीवर हल्ला झाला तेव्हा सगळ्याच जाती, धर्माचे लोक एकत्र आले हा इतिहास आहे. मुगल शासक अकबर याच्याविरुद्ध जेव्हा महाराणा प्रताप यांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिकांची संख्याही खूप मोठी होती असंही ते म्हणाले.
What is measure of our happiness? That a man named Bhagwat can constantly tell us how grateful we should be to the majority? The measure of our happiness is whether our dignity under Constitution is respected. Don't tell us how 'happy' we're while your ideology wants... pic.twitter.com/DjRe5lhSBx
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 10, 2020
भागवत पुढे म्हणाले, एखाद्या देशावर राज्य करणारा विदेश धर्म अजुनही अस्तित्वात आहे असं उदाहरण फक्त भारतात बघायला मिळतं. पाकिस्तान अजुनही इतर धर्मियांना समान अधिकार नाहीत.
भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल असं आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे.
कोण कुठल्या ईश्वराची पूजा करतो किंवा त्याची जीवनपद्धती काय आहे याचा हिंदू असण्याची काहीही संबंध नाही. इथे प्रत्येकाला आपल्या श्रद्धेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. धर्म हा तोडणारा नाही तर सर्वांना एका समान धाग्यात जोडणारा आहे असंही भागवत यांनी सांगितले.