ओवेसींच्या सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, वाचा त्यावर काय म्हणाले MIM चीफ

ओवेसींच्या सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, वाचा त्यावर काय म्हणाले MIM चीफ

CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला.

  • Share this:

बंगळुरू,20 फेब्रुवारी: CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. एका तरुणीने थेट व्यासपीठावरून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तरुणीचे नाव अमूल्या असे सांगितले जात आहे. यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'भारत जिंदाबाद था और रहेगा', आम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणेचे समर्थन करत नाही.

सभेत असदुद्दीन ओवेसी भाषण करण्यासाठी उभे राहिले असता अमूल्या हिने माईक हातात घेऊन 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, तिने तिचे बोलणे सुरूच ठेवले होते. तरुणीने व्यासपीठावर येत तुम्हाला 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते', असे सांगत 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. ती घोषणा देत असताना खुद्द ओवेसींनी धावत जाऊन तिला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवले आणि तिच्या हातातून माईक हिसकावून नंतर तिला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. संबंधित तरुणी सेव्ह कॉन्स्टिट्यूशन नामक संस्थेतर्फे व्यासपीठावर बोलण्यासाठी बोलावण्यात आले होते.

'एकदा कसाबही म्हणाला होता, भारत माता की जय'

शत्रू देश पाकिस्तानचे समर्थन नाहीच..

ओवेसी म्हणाले, आयोजकांनी संबंधित तरुणीला बोलवले नव्हते. याबाबत आधीच कल्पना असती तर सभेला आलोच नसतो. भारत आमचा देश असून आम्ही कोणत्याही परिस्थिती शत्रू देश पाकिस्तानचे समर्थन करत नाही. भारताला वाचवण्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत. व्यासपीठावर उपस्थित जनता दलाचे (एस) नगरसेवक इमरान पाशा यांनी सांगितले की, तरुणीला विरोधी गटाने पाठवल्याची शक्यता आहे. तिला आयोजकांनी निमंत्रित केलेले नव्हते. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

15 कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?

First published: February 20, 2020, 9:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या