कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची डिलीव्हरी, बाळाच्या प्रकृतीबाबत डॉक्टर म्हणाले...

कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची डिलीव्हरी, बाळाच्या प्रकृतीबाबत डॉक्टर म्हणाले...

कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झालेल्या महिलेने निरोगी बाळाला जन्म दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 एप्रिल : एखाद्या महिलेला प्रेग्नन्सीत कोरोनाव्हायरसचं निदान झालं, तर तिच्या गर्भातील बाळाला व्हायरसचा धोका आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कारण दिल्लील्या एम्स रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेने निरोगी बाळाला जन्म दिला आहे.

9 महिन्यांची गरोदर असलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान गुरुवारी झालं. AIIMS रुग्णालयात डॉक्टर असलेल्या तिच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ही महिला आणि तिच्या दिरालही व्हायरसची लागण झाल्याचं समजलं. या महिलेची प्रसूती करणा-या डॉ. नीरजा भाटला यांनी सांगितल्यानुसार, "शुक्रवारी संध्याकाळी प्रसूती झाली. मदतीच्या एक आठवडा आधीच सिझेरियन करण्यात आलं. बाळ निरोगी आहे. त्याला कोणतीच समस्या नाही"

नोटांवर थुंकण्याऱ्या विकृतांवर उद्धव ठाकरे संतापले, कडक शब्दांत दिला इशारा

दरम्यान सध्या या बाळावर देखरेख ठेवली जाणार आहे, त्याच्यामध्ये लक्षणं दिसली तर चाचणी करणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. चीनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातही कोरोनाग्रस्त महिलांच्या बाळांना कोरोनाव्हायरस नसल्याचं निदान झालं होतं.ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या कोणती लक्षणं नाहीत. बाळ सध्या आता आईकडेच आहे जेणेकरून त्याला आईचं दूध मिळेल.

कोरोनाग्रस्त आईने बाळाला स्तनपान केल्यास त्याला व्हायरसचा धोका नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने स्पष्ट केलं आहे. WHO च्या मार्गदर्शनानुसार बाळाला आईचं दूध देताना आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पाकिस्तानचा धक्कादायक कट, कोरोना झालेल्या दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याची तयारी

First published: April 4, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading