खरा योद्धा! कोरोना रुग्णाला वाचवण्यासाठी डॉ. जाहिद यांनी पत्करला धोका, PPE किट हटवून केले उपचार

खरा योद्धा! कोरोना रुग्णाला वाचवण्यासाठी डॉ. जाहिद यांनी पत्करला धोका, PPE किट हटवून केले उपचार

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी त्यांना PPE किट दिलं जातं, मात्र या डॉक्टरानं उपचारादरम्यान स्वत:चा जीव धोक्यात टाकत कोरोना रुग्णाला वाचवलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस भारतात वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागातील हे योद्धा आपलं घरदार विसरून दिवसरात्र मेहनत करत आहेत. यामुळं कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगारांना आपल्या जीवाची पर्वा न करता काम करावं लागत आहे. अशाच एका डॉक्टरानं आपला जीव धोक्यात टाकून एका रुग्णांवर उपचार केले. हे घडलं दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स रुग्णालयात. इथं एका डॉक्टरानं कोरोना रुग्णाला वाचवण्यासाठी चक्क PPE किट हटवून उपचार केले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी त्यांना PPE किट दिलं जातं, मात्र या डॉक्टरानं उपचारादरम्यान स्वत:चा जीव धोक्यात टाकत कोरोना रुग्णाला वाचवलं. आता या डॉक्टराला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. डॉ. जाहिद अब्दुल माजीद असं या डॉक्टरांचं नाव आहे. डॉ. जाहिद एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांना एका रुग्णाला ट्रॉमा सेंटरमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले. रमदान असल्यामुळे डॉ. जाहिद यांना रोजा सोडायचा होता, मात्र रुग्णाची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांनी रोजा न सोडता मदतीसाठी पोहचले. या रुग्णाला रुग्णवाहिकेतून ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. यावेळी रुग्णालयात रुग्णासोबत डॉ. जाहिद होते.

रुग्णाची परिस्थिती एवढी नाजूक होती की त्याला कृत्रिम श्वासोश्वास पुरवणाऱ्या नळीद्वारे श्वास घेता येत नव्हता. डॉ. जाहिद यांनी ही नळी पुन्हा लावण्यास सुरुवात केली. मात्र रुग्णवाहिकेत प्रकाश नसल्यामुळं आणि फेस शील्ड व प्रोटेक्टिव गॉगल घातल्यामुळे डॉ. जाहिद यांना निट दिसत नव्हतं. त्यामुळं अजिबात वेळ न दवडता त्यांनी फेस शील्ड आणि गॉगट हटवलं आणि ऑक्सिजन पुरवठा देणारी नळी व्यवस्थित केली. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

PPE किट ही डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असते, मात्र रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी या डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात टाकला. डॉ. जाहिद यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केलं जात आहे. सध्या डॉ. जाहिद यांनी 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यानंतर कदाचित त्यांची कोरोना चाचणी केली जाऊ शकते.

अरे बापरे! शहरात तब्बल 334 कोरोना सुपर स्प्रेडर; नकळत पसरवत आहेत व्हायरस

धक्कादायक! कॅन्सरनं घेतला आणखी एक जीव, क्राइम पेट्रोलच्या अभिनेत्याचं निधन

First published: May 12, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading