ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची वेबसाईट हॅक, भारतविरोधी आक्षेपार्ह पोस्ट

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची वेबसाईट हॅक, भारतविरोधी आक्षेपार्ह पोस्ट

हॅकर्सनी वेबसाईट हॅक करून त्यावर कुलभूषण जाधव आणि भारतविरोधी पोस्ट टाकण्यात आली आहे.

  • Share this:

10 मे : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची (अखिल भारतीय फुटबॉल महासंघ) वेबसाईट हॅक करण्यात आली.  हॅकर्सनी वेबसाईट हॅक करून त्यावर कुलभूषण जाधव आणि भारतविरोधी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास काहींनी हॅक झालेल्या वेबसाईटचे स्क्रिनशॉट्स ट्विट केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. हॅकर्सनी वेबसाईट हॅक करुन त्यात भारताविरोधात आणि भारतीयांविरोधात अपशब्द वापरत एक मेसेज सोडला आहे. दरम्यान, या हॅकिंगमागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

पाकिस्तान हॅकर्सने वेबसाईटवर कुलभूषण जाधव यांचा फोटो आणि त्यासोबत फाशीचा फंदा टाकला आहे. तसंच, ‘तुम्हाला कुलभूषण जाधव हवे आहेत का ? तुम्ही कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात का ? आम्ही तुम्हाला त्यांचा मृतदेह पाठवून देऊ,’ असा संदेश हॅकर्सनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. ‘तुम्हाला स्नॅपडिल आणि स्नॅपचॅटमधील फरक समजत नाही आणि तुम्ही कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात,’ असा मेसेज हॅकर्ससने भारतीयांसाठी वेबसाईटवर टाकला आहे.

दरम्यान, कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने या हॅकिंगमागे पाकिस्तानचा संशय असण्याची दाट शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 02:00 PM IST

ताज्या बातम्या