जयललितांचा अखेरचा व्हिडिओ लिक, निवडणूक आयोगाने आणली बंदी

जयललितांचा अखेरचा व्हिडिओ लिक, निवडणूक आयोगाने आणली बंदी

आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक आयोगाने या व्हिडिओवर बंदी आणली असून वेत्रिवेल यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहे.

  • Share this:

20 डिसेंबर : तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकच्या माजी अध्यक्षा जयललिता यांचा हाॅस्पिटलमधील उपचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वादळ आलंय. निवडणूक आयोगाने या व्हिडिओवर बंदी घातली आहे.

तामिळनाडूमध्ये आरके नगर विधानसभा पोट निवडणुकीच्या एक दिवस आधी अण्णाद्रमुकचे नेते टीटीवी दिनाकरन यांच्या गटाने माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. हा व्हिडिओ जयललिता यांच्यावर अपोलो हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाचा आहे. जयललिता एका प्लास्टिकच्या ग्लासने ज्यूस पित असल्याचं दिसून येतंय. पोटनिवडणुकीच्या आधी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तामिळनाडूमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

आरके नगर हा जयललिता यांचा मतदारसंघ होता. मागील वर्षी 5 डिसेंबरला जयललिता यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. वर्षभरानंतर या जागेवर पोट निवडणूक होत आहे.  अण्णाद्रमुकने अम्मांच्या निधनावर संशय व्यक्त करत याबाबत समिती स्थापन केली होती. अशातच दिनाकरन गटाने जयललितांचा व्हिडिओ प्रसिद्ध करून लोकांचा सहानुभुती मिळवण्यासाठी प्रयत्न केलाय.

कुणी रेकाॅर्ड केला हा व्हिडिओ ?

हा व्हिडिओ कुणी रेकाॅर्ड केला असा सवाल आता विचारला जातोय. यावर पक्षाचे नेते वेत्रिवेल यांनी खुलासा केलाय.

जयललिता यांना अपोलो हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. अम्मांना आयसीयूमधून दाखल केलं होते, तेव्हा शशिकला यांनी हा व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता. दिनाकरन आणि शशिकला यांना विचारूनच हा व्हिडिओ आपणच प्रसिद्ध केलाय. ओ पन्नीरसेल्वम आणि ई पलानीस्वामी यांचा गट अम्मांच्या निधनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळावा म्हणून हा व्हिडिओ प्रसिद्ध केला असा दावा वेत्रिवेल यांनी केलाय.

आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक आयोगाने या व्हिडिओवर बंदी आणली असून वेत्रिवेल यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहे.

First published: December 20, 2017, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading