पेपर वाचताना आमदाराला आला झटका

पेपर वाचताना आमदाराला आला झटका

पेपर वाचताना तामिळनाडूमध्ये आमदाराचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे.

  • Share this:

कोईंबतूर, 21 मार्च : तामिळनाडूनमध्ये AIADMKचे आमदार आर. कनगराज यांचा सकाळी पेपर वाचत असताना हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. ते 66 वर्षांचे होते. सुल्लुर मतदारसंघातून ते AIADMKचे प्रतिनिधित्व करत होते. दरम्यान, त्यांच्या अंत्यविधिसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि इतर मंत्री देखील हजर राहणार आहेत.

AIADMKच्या संख्याबळात घट

आर. कनगराज यांच्या मृत्यूमुळे आता AIADMKच्या संख्याबळात घट झाली आहे. AIADMKचं संख्याबळ आता 113 इतकं खाली आलं आहे. दरम्यान, तामिळनाडू विधानसभेत सध्या 22 जागा रिक्त आहेत. 2016मध्ये आर. कनगराज हे कोईंबतूरमधील सुल्लूर येथून 35,000 मतांनी निवडून आले होते. आर. कनकराज यांना शेतीची देखील आवड होती.

VIDEO: राष्ट्रवादीची धुळवड : 'बुरा ना मानो होली है' म्हणत आव्हाड मोदींबद्दल काय म्हणाले पाहा

First published: March 21, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading