News18 Lokmat

अण्णाद्रमुक पुन्हा एकत्र, एनडीएला मिळणार घटकपक्ष ?

अण्णा द्रमुक आता केंद्र सरकारमध्ये, अर्थात एनडीएत सहभागी होण्याच्या तयारीत आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2017 09:36 PM IST

अण्णाद्रमुक पुन्हा एकत्र, एनडीएला मिळणार घटकपक्ष ?

21 आॅगस्ट : तामिळनाडूमध्ये सत्ताधारी पक्षाचे अण्णाद्रमुकचे दोन गट 6 महिन्यानंतर एकत्र आले आहे.  आता पन्नीरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्‍वामी एकत्र आले आहे. त्यामुळे पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. तर पार्टीच्या अध्यक्षा जयललिता यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. आणि हा पक्ष आता केंद्रात जाण्याचीही दाट शक्यता आहे.

अम्मा गेल्या आणि त्यांचा पक्ष फुटला. ओ पन्नीरसेल्वम आणि एडपड्डी के पलनीसामी असे दोन गट झाले. पलनीसामी मुख्यमंत्री झाले, पन्नीरसेल्वम बाहेर पडले. पण आज हे दोन गट पुन्हा एकत्र आले. पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्री झाले. आणि एवढंच नाही, त्यांनी अम्मांची मैत्रीण आणि सध्या जेलमध्ये असलेल्या शशिकलांना पक्षातून काढून टाकलं. पण याहीपेक्षा जास्त महत्वाची राजकीय घडामोड घडलीय.

अण्णा द्रमुक आता केंद्र सरकारमध्ये, अर्थात एनडीएत सहभागी होण्याच्या तयारीत आहे. त्यांना 2 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री पदं मिळण्याची शक्यता आहे. अम्मांच्या पक्षाचे लोकसभेत 39 तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. केंद्रात मंत्रिपदांच्या बदल्यात 2019मध्ये भाजपला तामिळनाडूत लढण्यासाठी जागा मिळतील.

म्हणजेच, तथाकथित उत्तर भारतीय असलेल्या भाजपला तामिळनाडूत पहिल्यांदा छातीठोकपणे शिरकाव करता येईल. हा अमित शहांचा दुसरा मास्टरस्ट्रोक म्हणायला हवा. काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी भाजपशी युती केली. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात जदयूला कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.

2019चे पडघम वाजू लागलेत, असं म्हणायला आता हरकत नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी कामाला लागलेत. आणि 2019 मध्ये फक्त जागा राखण्यासाठी नव्हे, तर जागा वाढवण्यासाठी हे सगळं केलं जातंय. असं म्हणतात, शहांनी अशा 120 जागांची यादी बनवलीय ज्या 2014 मध्ये जिंकता आल्या नाहीत, पण यावेळी जिंकायच्या आहेत. त्या यादीत तामिळनाडूतल्याही जागा असणार, यात शंका नाही.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...