'युती' नंतर भाजपचा तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी घरोबा!

'युती' नंतर भाजपचा तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी घरोबा!

तामिळनाडूतला दुसरा मोठा पक्ष असलेला द्रमुक हा काँग्रेसच्या आघाडीत असल्याने अण्णाद्रमुकलाही भाजपशीवाय पर्याय नव्हता.

  • Share this:

चेन्नई 19 फेब्रुवारी : महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेशी जुळवून घेतलं आणि 'युती'वर मोहोर उमटली. 'युती' झाल्याने भाजपला मोठा दिलासा मिळालाय. महाराष्ट्रातील मोहिम फत्ते झाल्यानंतर भाजपने दक्षिणेतही स्वारी केलीय. सत्ताधारी अण्णाद्रमुकशीही भाजपने आज युती केली. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी अण्णाद्रमुकशी वाटाघाटी करत युती झाल्याचं आज जाहीर केलं.

जयललीता यांच्या निधनानंतरच भाजपने अण्णाद्रमुकशी जवळीक सुरू केली. जयललीता नंतर आधारच गेलेल्या नेत्यांनाही केंद्राची मदत आवश्यक होती. त्यामुळे ते भाजपकडे ओढले गेले. मुख्यमंत्री ई पलानीसामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी पीयुष गोयल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर समाधान व्यक्त करत ही  जिंकणारी युती असल्याचं मत व्यक्त केलं.

तामिळनाडूतला दुसरा मोठा पक्ष असलेला द्रमुक हा काँग्रेसच्या आघाडीत असल्याने अण्णाद्रमुकलाही भाजपशीवाय पर्याय नव्हता. द्रमुकचे नेते एम.के.स्टॅलीन यांनी तर राहुल गांधीच पंतप्रधान व्हावेत असंही म्हटलं होतं. त्यामुळे अण्णाद्रमुक हा भाजपकडे ओढला गेला. तामिळनाडूतल्याच इतर छोट्या पक्षांशीही भाजपची बोलणी सुरू आहे.

तामिळनाडूत भाजपचा जनाधार फारसा नाही. मात्र इतर पक्षांचा भाजपला फायदा होऊ शकतो. 2014 सारखी स्थिती सध्या नाही याची भाजपला जाणीव आहे. त्यामुळे भाजप मित्र पक्ष जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.

VIDEO : राहु दे, धनंजय मुंडेंनी चहाचे दिले चक्क 2000 रुपये!

First published: February 19, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading