अरे देवा! फक्त नंबर प्लेट नाही म्हणून व्याजासकट भरावा लागला 27 लाखांचा दंड

अरे देवा! फक्त नंबर प्लेट नाही म्हणून व्याजासकट भरावा लागला 27 लाखांचा दंड

नंबर प्लेट नाही म्हणून भरला देशातला सर्वात जास्त दंड, कोण आहे ज्यानं भरला 27 लाखांचा दंड.

  • Share this:

अहमदाबाद, 09 जानेवारी: वाहन चालकांसाठी नियम सक्त केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो. मात्र फक्त गाडीला नंबर प्लेट नाही म्हणून 27 लाख रुपयांचा दंड कोणी भरल्याचे ऐकले आहे? असा प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. येथील एका अवलियाला पॉर्शे 911 स्पोर्ट्स कार परत घेण्यासाठी 27.68 रुपयांचा दंड भरावा लागला.

अहमदाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कागदाअभावी ही पॉर्शे 911 स्पोर्ट्स कार ताब्यात घेतली होती. त्यानंतर कारच्या मालकाने थकित कर, व्याज आणि दंड यासह ही रक्कम भरली. मंगळवारी रणजित देसाई यांनी अहमदाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्कम जमा केल्यानंतर त्यांची जप्त केलेली गाडी वाहतूक पोलिसांकडून परत घेतली.

वाचा-मध्ये रेल्वेवरही आता गारेगार प्रवास, या मार्गावर धावणार AC लोकल

वाचा-लग्न, घटस्फोट, व्हर्जिनिटी... लग्नानंतर चारच दिवसांनी नेहा पेंडसेनं केला खुलासा

मुख्य म्हणजे नोव्हेंबरमध्ये पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली होती. यानंतर अहमदाबाद ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आरटीओ पावतीचे छायाचित्र ट्वीट केले आहे. पोलिसांचा दावा आहे की 27.68 लाख रुपये हा दंड देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आहे. बुधवारी पोलिसांनी ट्वीट केले की, "आरटीओने पॉर्शे कारवर 27. 68 लाखांचा दंड ठोठावला आहे. कागदाअभावी पोलिसांनी ते ताब्यात घेतले. आजपर्यंत देशात एवढा दंड घेण्यात आलेला नाही."

वाचा-Jawaani Jaaneman Trailer: अम्मी का बेटा गे है! सैफचा स्वॅग आणि तब्बूचा ट्विस्ट

वाचा-33 सेकंदात झाला 180 प्रवाशांचा मृत्यू! समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा VIDEO

28 नोव्हेंबर रोजी वाहनावर नंबर प्लेट नसल्याने वाहन थांबविण्यात आले. यानंतर हे वाहन पोलिसांच्या ताब्यात गेले. या प्रकरणात, पोलिसांनी असे सांगितले की जेव्हा कारमधून चालकांना कागद मागितले गेले, तेव्हा त्याच्याकडे सर्व कागदपत्रे नव्हती. "त्यानंतर आम्ही वाहन घेऊन मोटार वाहन कायद्यांतर्गत निवेदन दिले. त्यानंतर गाडीच्या मालकास दंड भरावा लागला आणि गाडी परत घेण्यासाठी पावती दर्शविली जावी," असे पोलिसांनी सांगितले. याआधी 9.8 लाख रुपये दंड वसुल करण्यात आला होता. मात्र आता चक्क पहिल्यांदाच 27.68 लाख रुपये दंड भरण्यात आला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: January 9, 2020, 7:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading