काँग्रेसने नाकारले 'त्या'ने मैदान मारले, भाजपने जवळ केले 100 पूर्ण झाले !

आता एका अपक्ष उमेदवारने पाठिंबा दिल्यामुळे भाजपला कशीबशी शंभरी गाठता आलीये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2017 09:28 PM IST

काँग्रेसने नाकारले 'त्या'ने मैदान मारले, भाजपने जवळ केले 100 पूर्ण झाले !

22 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीत 22 वर्षांत भाजपची खराब कामगिरी झालीये. भाजपला विधानसभा निवडणुकीत शंभरचा आकडाही गाठता आला नाही. आता एका अपक्ष उमेदवारने पाठिंबा दिल्यामुळे भाजपला कशीबशी शंभरी गाठता आलीये. विशेष म्हणजे हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागांवर समाधान मानावे लागेल. तर काँग्रेसने जोरदार टक्कर देत 80 जागांचा आकडा गाठत दुसरे स्थान पटकावले आहे. 99 जागांवर नाचक्की झाल्यामुळे भाजपने आता शंभरचा आकडा गाठलाय. लुनावाडा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रतनसिंह राठोड यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. याबाबत राज्यपालांना पत्रही लिहिले आहे.  राठोड यांनी पाठिंबा दिल्यामुळे 182 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपची संख्या 100 झाली आहे.

रतनसिंह राठोड पहिले काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढणार होते. पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे राठोड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. काँग्रेसने राठोड यांच्यावर कारवाई करत 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलीये. अपक्ष म्हणून राठोड विजयी झाले.

सहावर्षांतली भाजपची सर्वात खराब कामगिरी

गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजपने विजय मिळवलाय. पण यावेळी भाजपची चांगलीच दमछाक झालीये. याआधी 1995 मध्ये भाजपने 125 जागा जिंकल्या होत्या. 1998 मध्ये 117, 2002 मध्ये 127, 2007 मध्ये 117, 2012 मध्ये 115 आणि आता 2017 मध्ये भाजपने 99 जागा जिंकल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...