3 CCTV कॅमेऱ्यात कैद झालं मृत्यूचं थैमान; अहमदाबाद स्फोटाचा LIVE VIDEO आला समोर

3 CCTV कॅमेऱ्यात कैद झालं मृत्यूचं थैमान; अहमदाबाद स्फोटाचा LIVE VIDEO आला समोर

अहमदाबादच्या एका कापड गिरणीच्या गोदामात स्फोट झाला. या घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्फोट कसा झाला हे दाखवणारी भीषण दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

  • Share this:

अहमदाबाद, 4 नोव्हेंबर: अहमदाबादच्या एका कापड गिरणीच्या गोदामात भीषण स्फोट होऊन आग भडकली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. NDRF च्या टीम बचाव कार्य करत आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, संपूर्ण इमारत हादरली. छताचे तुकडे 50  मीटरपर्यंत उडून पडले.

स्फोटाची जागा आता पाहणाऱ्यांना ही जागा युद्धभूमीसारखी वाटावी, अशी धुमसते आहे. ज्या क्षणी स्फोट झाला त्या वेळी इमारतीच्या बाहेरपर्यंत आगीचे लोळ बाहेर आले. ही संपूर्ण घटना वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या  CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. स्फोटाच्या हादऱ्याने CCTV सुद्धा बंद पडले. पण जेवढे क्षण रेकॉर्ड झाले, त्यातूनच या स्फोटाची भीषणता लक्षात येईल.

ही सुती कापडाची मिल पिराना पिपलाज रस्त्यावर नानूकाका इस्टेट या भागात होती. ज्या इमारतीमध्ये स्फोट झाला ती संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि NDRF चे जवान बचावकार्यात आहेत. त्यांनी आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका केली आहे. काही जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात आहेत, तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाच्या हादऱ्याने छत उडालं. या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अद्यापही घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

अग्निशमन दलाने सुरुवातीला वर्तवलेल्या अंदाजानुसार कुठल्या तरी केमिकल लॅबमध्ये हा स्फोट झाला असावा. कारखान्यातल्या काही रसायनांचा स्फोट झाल्याचा किंवा बॉयलरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी 'ट्वीट'मध्ये म्हटलं आहे की, अहमदाबाद येथील गोडाऊनला लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांचं त्यांनी सांत्वन केलं आहे. जखमींसाठी देखील पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे आहे. प्रशासनाकडून मृतांच्या नातवाईकांनी मदत करण्यात येत आहे.

गुजरातमधील (Gujarat)अहमदाबाद शहरात (Ahmedabad) टेक्सस्टाईल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. काहीचं प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 4, 2020, 7:36 PM IST
Tags: ahmedabad

ताज्या बातम्या