RJ प्रेयसीसाठी व्हॅलेंटाइनच्या दिवशीच पत्नीला दिलं 'मृत्यूचं गिफ्ट', १५ वर्षांनंतर धक्कादायक खुलासा

RJ प्रेयसीसाठी व्हॅलेंटाइनच्या दिवशीच पत्नीला दिलं 'मृत्यूचं गिफ्ट', १५ वर्षांनंतर धक्कादायक खुलासा

तरूण सजलीला पूर्ण विसरून गेला होता. अहमदाबाद पोलिसही हे प्रकरण विसरले असतील असं त्याला वाटलं

  • Share this:

बँगलोर, २५ ऑक्टोबर २०१८- ही बातमी आहे १५ वर्षापूर्वी आरजे प्रेयसीला व्हॅलेंटाईनचं गिफ्ट देण्यासाठी एका नवऱ्याने व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी पत्नीची निघृण हत्या केली. बास्केटबॉल प्रशिक्षक प्रियकराचे हे कृत्य पाहून प्रेयसीने त्याच्यासोबतची सर्व नाती तोडून टाकली. यानंतर आरोपीने आपलं नाव आणि ओळख बदलली आणि गर्दीतला एक माणूस होऊन वावरू लागला. मात्र, देशातील एक नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत मॅनेजरची नोकरी करणाऱ्या प्रियकराने स्वप्नातही विचार केला नसेल की १५ वर्षानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतील.

अहमदाबाद क्राइम ब्रांचने १५ वर्ष जुन्या या प्रकरणाचा झडा लावल्याचे स्पष्ट केले आहे. २००३ मध्ये सजनी हत्याकांडने गुजरात पोलिसांची झोप उडवली होती. याचमुळे गेली १५ वर्ष आरोपीला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत राहिले आणि अखेर त्यांना यात यश मिळालं.

अहमदाबाद क्राइम ब्रांचची टीम बँगलोरस्थित देशातील नावाजलेली सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलच्या ऑफिसमध्ये पोहोचली. कंपनीच्या मॅनेजमेंटचे चीफ मॅनेजर प्रवीण भाटेलीला तडकाफडकी अटक केली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना नक्की काय घडत आहे तेच कळले नाही. पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांच्यासमोर प्रवीणला तरूण जिनराज म्हणून हाक मारली तेव्हा सर्वच अवाक झाले. यावेळी तरूण काहीही न बोलता पोलिसांसोबत निघून गेला.

प्रविणला पोलिसांनी तरूण अशी का हाक मारली हे कर्मचाऱ्यांना कळले नाही. तसेच प्रवीण काहीच न बोलता पोलिसांसोबत कसा गेला हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहीला. या सर्व प्रश्नांची उत्तरं तेव्हा मिळाली जेव्हा अहमदाबाद क्राइम ब्रांचने पत्रकार परिषद घेऊन अहमदाबादमधील सर्वात मोठ्या हत्याकांडच्या आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. पकडला गेलेला आरोपी हा तरुण जिनराज असून त्याच्यावर पत्नीची हत्या करण्याचा आरोप आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर गर्लफ्रेंडसोबत फिरतोय हा बॉलिवूड स्टार

काय आहे हे संपूर्ण प्रकरण-

१४ फेब्रुवारी २००२ मध्ये सजनी जिनराज आणि तरुण जिनराज हे पती- पत्नी अहमदाबादमध्ये बोपल येथील एका फ्लॅटमध्ये राहत होते. १४ फेब्रुवारी हा दिवस दोघांसाठीही सर्वसामान्य दिवसांसारखाच होता. अचानक कंट्रोल रूममध्ये पोलिसांना फोन आला की एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना घराच्या दरवाजावर पती तरुण जिनराज जोरजोरात रडताना दिसला. त्याच्या हातात एक गिफ्टही होते. घरात सजनीचा मृतदेह बेडवर पडला होता. तरूण व्हॅलेंटाइनचं गिफ्ट घ्यायला बाहेर गेला असता त्याच्या पत्नीचा खून करण्यात आल्याचे त्याने सांगितले. सजनीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.

पोर्स्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सजनीची श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपीने कोणताच पुरावा मागे ठेवला नव्हता. डॉग स्क्वॉर्ड बोलवण्यात आल्यावर कुत्रा तरुणच्या बाजूला जाऊन उभा राहीला. सजनीच्या अंत्यसंस्कारानंतर तरूण बेशुद्ध झाला होता. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तरूणची चौकशी करण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस रुग्णालयात पोहोचले असता, तिथे तरूण त्यांना दिसलाच नाही.

तरुणच्या गायब होण्याने पोलिसांचा संशय अधिक घट्ट होत, सजनीचा खुनी दुसरा कोणी नसून तरूणच असल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतरही तरुणचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. तरुणने सजनीच्या हत्येनंतर प्रेयसीला फोन करत सर्व प्रकरण सांगितले. मात्र या सर्व गोष्टी ऐकताच तिने तरूणला भेटायला स्पष्ट नकार दिला. तसेच जर तिला परत संपर्क केला तर पोलिसांना सर्व गोष्ट सांगण्याची धमकीही तिने दिली.

यानंतर तरूणने त्याचा सर्वात जवळचा मित्र प्रविण भाटेलीचं नाव लावून दिल्लीमध्ये राहायला लागला. यावेळी तरूणने त्याची ओळख पूर्ण बदलली. २००८ पर्यंत त्याने दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम केले. दिल्लीनंतर तो पुण्यात राहायला आला. तरूण उर्फ प्रवीणने पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागला. यादरम्यान त्याची ओळख एका मुलीशी झाली आणि त्याने तिच्याशी लग्नही केले. लग्नानंतर तो पुण्याहून बँगलोरमध्ये राहायला आला. २०११ मध्ये त्याने ओरॅकलमध्ये काम करायला सुरूवात केली.

तरूण सजलीला पूर्ण विसरून गेला होता. अहमदाबाद पोलिसही हे प्रकरण विसरले असतील असं त्याला वाटलं, पण नेमकी इथेच तो चुकला. तरूणची आई तरूणसोबत राहत नाही ही माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. पोलिसांनी आईवर लक्ष ठेवायला सुरूवात केली होती. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तरूणची आई वर्षातले काही दिवस बँगलोरला जाते. अखेर पोलीस आईचा पाठलाग करत बँगलोरला पोहोचली. आता प्रवीणच तरूण आहे हे सिद्ध होणं बाकी होतं. चौकशीत प्रवीण नावाचा व्यक्ती तरूणचा जवळचा मित्र असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रवीणची चौकशी केली असता बँगलोरमध्ये राहणारा दुसरा कोणी नसून तरूण असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी मुद्दाम ओरॅकल कंपनीत प्रवीणला तरूण जिनराम अशी हाक मारली तेव्हा तरूणच्या चेहरा पांढरा फटफटीत पडला. अखेर १५ वर्षांपासून दबून राहिलेलं सत्य बाहेर आलं.

भयानक! लाईव्ह मर्डरचा व्हिडिओ व्हायरल; भर रस्त्यात महिलेला गोळ्या घातल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2018 10:15 PM IST

ताज्या बातम्या