Home /News /national /

'तू त्याच्याशी बोलू नको', काकूनं फटकारलं म्हणून 14 वर्षांच्या मुलीनं उचललं धक्कादायक पाऊल

'तू त्याच्याशी बोलू नको', काकूनं फटकारलं म्हणून 14 वर्षांच्या मुलीनं उचललं धक्कादायक पाऊल

या अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयानी वर्गातल्या मुलाशी बोलत असताना पाहिलं आणि खूप ओरडायला लागले.

    अहमदाबाद, 27 सप्टेंबर : मुलांसोबत बोलू नकोस असं नातेवाईकांनी ओरडल्यामुळे मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. 14 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला मुलाशी बोलल्यामुळे फटकारलं आणि त्याच रागातून तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीच्या काकूने तिला एका मुलाशी बोलताना पाहिले आणि त्यांनी तिला फटकारले. रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलीनं राहत्या घरीच दुपट्ट्याच्या मदतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या या मुलीनं मोठा निर्णय घेऊन आयुष्य संपवल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हे वाचा-ट्रेननं सायकलस्वाराला दिली धडक पण थोडक्यात बचावला जीव, पाहा थरारक VIDEO या अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयानी वर्गातल्या मुलाशी बोलत असताना पाहिलं आणि खूप ओरडायला लागले. गुरुवाती ही अल्पवयीन मुलगी कामानिमित्तानं घराबाहेर पडली त्याचवेळी तिथे तिचा वर्गमित्र घराजवळ भेटल्यानं त्याच्यासोबत गप्पा मारत उभी होती. हे या मुलीच्या काकूनं पाहिलं आणि तिला ओढत घरात आणलं आणि ओरडायला लागली. त्या मुलाशी पुन्हा बोलायचं नाही असा दमही भरला. याच रागातून अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरी आल्यावर मुलगी सरळ तिच्या खोलीत गेली. काही वेळानं तिच्या लहान भाऊ या रूमजवळ पोहोचला आणि समोरचं दृश्यं पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पंख्याला दुपट्टा बांधून या मुलीनं आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या