सोनिया गांधींच्या विश्वासू सल्लागाराची EDने केली 8 तास चौकशी, म्हणाले, ते तर मोदींचे पाहुणे

सोनिया गांधींच्या विश्वासू सल्लागाराची EDने केली 8 तास चौकशी, म्हणाले, ते तर मोदींचे पाहुणे

'सरकार जेव्हा कुठल्या संकटात असते तेव्हा ते असंच काहीतरी प्रकरण बाहेर काढतात त्यामुळे सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाते.'

  • Share this:

नवी दिल्ली 27 जून: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे (Sonia gandhi) विश्वासू अहमद पटेल (Ahmed-patel) यांची ED ने आज तब्बल 8 तास चौकशी केली. EDचं एक पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालं होतं. त्यांनी संदेसरा ग्रुप प्रकरणातल्या आर्थिक बाबींसंदर्भात ही चौकशी केली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देतांना अहमद पटेल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

EDचं पथक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पाहुणे होते. ते आले, त्यांनी प्रश्न विचारले आणि मी त्यांना उत्तरे दिली आणि ते गेले असं त्यांनी सांगितलं.

सरकार जेव्हा कुठल्या संकटात असते तेव्हा ते असंच काहीतरी प्रकरण बाहेर काढतात त्यामुळे सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाते. जेव्हा केहा निवडणुका असतात किंवा देशात एखादा प्रश्न महत्त्वाचा असतो तेव्हा अशाच प्रकारे या तपासण यंत्रणा सक्रिय होतात असा आरोपही त्यांनी केला.

देशात कोरोनाचं संकट मोठं आहे. चीन सीमेवर वाद सुरू आहे असं असतानाही सरकार ते प्रश्न सोडून विरोधकांशी लढत आहेत. असा आरोपही त्यांनी केला. आमच्याकडे लपवविण्यासारखं काहीच नसून आमचा आवाद दाबवण्यासाठी सरकार हा खेळ खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

First published: June 27, 2020, 11:39 PM IST

ताज्या बातम्या