काँग्रेस पक्षाच्या पायाभरणीत पटेल यांचे मोठे योगदान, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

काँग्रेस पक्षाच्या पायाभरणीत पटेल यांचे मोठे योगदान, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'अहमद पटेल यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. त्यांनी सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. त्यांनी आपल्या बुद्धीचार्तुयाने राजकीय जिवनामध्ये यश संपदान केले. त्यांनी काँग्रेस पक्षाची मजबूत पायाभरणी करण्यात त्यांची भूमिका ही कायम लक्षात राहणारी आहे. त्याचा मुलगा फैसल याच्याशी संवाद साधला असून सात्वंन केले आहे. अहमद पटेल यांच्या आत्माला शांती लाभो'

तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

'आजचा दिवस आमच्यासाठी दुखद आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधार स्तंभ होते. त्यांनी पडत्या काळात पक्षासाठी मोलाचे काम केले. त्यांचे पक्षाच्या पायाभरणीत मोठे योगदान होते. त्यांची आठवण कायम राहिल'

अहमद पटेल यांनी मागील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण (Ahmed Patel COVID Infected)  झाली होती. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल (Faisal Patel)याने वडिलांचे दु:ख निधन झाले आहे, अशी माहिती दिली.गुजरातचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचं पहाटे 3.30 वाजता निधन झाले अशी माहिती दिली.

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना 15 नोव्हेंबर रोजी गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 1 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

अहमद पटेल हे आठ वेळा संसदेचे सदस्य राहिले. तीन वेळा ते लोकसभा आणि पाच वर्ष ते राज्यसभेत होते. ऑगस्ट 2018 मध्ये आखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) च्या कोषाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती.

अहमद पटेल यांनी 1976 साली गुजरातमधील भरूच जिल्ह्यात  स्थानिक निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर गुजरात आणि केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाची संघटनात्मक वाढ होण्यासाठी काम पाहिले.

1985 मध्ये  तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर

अहमद पटेल यांनी सरदार सरोवर योजनेची पाहणी करण्यासाठी  नर्मदा प्रबंधन प्राधिकरण स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 8:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या