भाजपच्या धोरणामुळे गुजरातमधील अहिर समाज अडचणीत

भाजपच्या धोरणामुळे गुजरातमधील  अहिर समाज अडचणीत

गुजरातमध्ये ओबीसींमधला एक महत्वाचा समाज म्हणजे अहिर समाज. या समाज गुजरातमधल्या जुनागढ, पोरबंदर, गिर सोमनाथ आणि अमरेली या जिल्हयात मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील या समाजाची एकूण लोकसंख्या जवळपास ३० ते ३५ लाख इतकी आहे. हा समाज प्रामुख्याने शेती या व्यवसायात आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतमालाला योग्य तो भाव मिळवून दिला नाही असा आरोप या समाजाचे अध्यक्ष गोविंदभाई चोचा यांनी केला आहे.

  • Share this:

03 डिसेंबर: गुजरातमध्ये ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणात आहे, त्यातलाच एक समाज म्हणजे अहिर समाज. पण यावेळी अहिर समाजाने भाजपला हरवण्याचा चंगच बांधला आहे. भाजपने शेतमालाला योग्य भाव न दिल्याने हा समाज अडचणीत आला आहे.

गुजरातमध्ये ओबीसींमधला एक महत्वाचा समाज म्हणजे अहिर समाज. या समाज गुजरातमधल्या जुनागढ, पोरबंदर, गिर सोमनाथ आणि अमरेली या जिल्हयात मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील या समाजाची एकूण लोकसंख्या जवळपास ३० ते ३५ लाख इतकी आहे. हा समाज प्रामुख्याने शेती या व्यवसायात आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतमालाला योग्य तो भाव मिळवून दिला नाही असा आरोप या समाजाचे अध्यक्ष गोविंदभाई चोचा यांनी केला आहे. राज्य सरकारनं शेतीकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही अडचणीत आलो असल्याचं या समाजाचं म्हणणं आहे.

या समाजात भाजपविरोधात राग असण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या समाजाच्या व्यक्तीला जुनागढमधून भाजपनं नाकारलेली उमेदवारी. यानं आपल्या समाजाचा मान भाजपनं राखला नाही त्यामुळे त्यांना याची राजकीय किंमत येत्या निवडणुकीत चुकवावी लागेल असा इशारा या समाजाचे नेते देत आहेत.

 

आपली ज्या भागात ताकद आहे तिथं भाजपला नमवण्यासाठी आपली ताकद लावायची असा चंगच या सामाजानं बांधला असल्याचं या समाजाच्या नेत्यांच्या बोलण्यातून जाणवतंय.

 

First Published: Dec 3, 2017 02:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading