CAA Protest : दगडफेक करणाऱ्यांना पोलीस म्हणत होते, 'असं करू नका'; सुन्न करणारा VIDEO

CAA Protest : दगडफेक करणाऱ्यांना पोलीस म्हणत होते, 'असं करू नका'; सुन्न करणारा VIDEO

अहमदाबाद मध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये 19 पोलीस कर्मचारी जखमी झाले.

  • Share this:

अहमदाबाद, 20 डिसेंबर : नागरिकत्व कायद्याविरोधात काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. यामध्ये अहमदाबादमध्ये पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आलं. आंदोलनानंतर पोलीस कर्मचारी ड्यूटी संपवून जात असताना त्यांच्यावर जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी चहुबाजुंनी घेरण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी घराच्या भिंतीचा आधार घेतला. तरीही जमावाकडून तुफान दगडफेक सुरू होती.

दगडांचा अक्षरश: वर्षाव होत असताना पोलिसांकडून जमावाला असं न करण्याचे आवाहन केले जात होते. तरीही त्यांच्या दिशेने दगडांचा मारा सुरुच होता. हिंसक वळण लागलेल्या या आंदोलनाचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. याठिकाणी दुसऱ्या एका घटनेत काहींचा जमाव पोलिसांच्या गाडीला घेराव घालतो. यानंतर पोलिसांना धक्का देऊन गाडीवर चढवात आणि गाडी उलटवण्याचा प्रयत्न केला गेला.

संतप्त झालेल्या जमावापुढे पोलिस हतबल झाले होते. जमाव काहीही ऐकून घेत नव्हता. यानंतर अहमदाबाद-पालनपुर महामार्ह बंद करण्यात आला होता. शाह आलम परिसरात पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली.

घटनेनंतर पोलिस कमिश्नर आशीष भाटिया यांनी सांगितलं की, 32 लोकांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे इतर लोकांची ओळख पटवली जाणार आहे. यामध्ये 19 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा : जामिया मिलिया इस्लामियाची वेबसाईट हॅक, लिहिला हा संदेश...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Gujrat
First Published: Dec 20, 2019 07:24 AM IST

ताज्या बातम्या