Elec-widget

दिल्लीत खलबतं: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पवार म्हणाले, ही भेट फक्त...

दिल्लीत खलबतं: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पवार म्हणाले, ही भेट फक्त...

पवारांनी संसदेतील PM मोदींच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट तब्बल 45 मिनिटे झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय कोंडी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेत भेट घेतली. पवारांनी संसदेतील PM मोदींच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट तब्बल 45 मिनिटे झाली.

एका बाजूला राज्यातील सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात बैठक होणार असताना त्याआधी आज संसदेत दुपारी साडेबाराच्या सुमारास पवारांनी मोदींची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार याबद्दल संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली होती. विशेषत: गेल्या काही दिवसात राज्यात शिवमहाआघाडीचे सरकार येणार अशी चर्चा सुरु असताना पवारांच्या या भेटीला प्रचंड महत्त्व आले होते. राज्यात भाजप आणि शिवसेना यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्व घडामोडींचे केंद्र शरद पवारच राहिले आहेत.

या भेटीनंतर पवारांनी मोदींसोबत कोणत्याही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. पवारांनी मोदींना पुण्यातील साखर परिषदेला येण्याचे आमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे पवारांसोबत बैठक सुरु असताना पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बोलवून घेतले होते. त्यानंतर बैठक संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीला आले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. पवार आणि मोदींची भेट झाल्यानंतर तातडीने मोदी-शहा यांची भेट झाल्यामुळे विविध तर्क लढवले जात आहेत.

या भेटीत पवारांनी मोदींना एक पत्र देखील दिले आहे. या पत्रात राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत.

Loading...

अपडेट-

पवारांची भेट झाल्य़ानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मोदींच्या भेटीला

पवार आणि मोदी यांच्यात 45 मिनिटे चर्चा झाली

शेतकऱ्यांना संपूर्ण , बिनशर्त कर्जमाफी द्या- पवार

सध्याचे कृषीकर्ज देखील पूर्णपणे माफ करा-पवार

मोठ्या मदतीसाठी तातडीची पावले उचला-पवार

राज्यातील राष्ट्रपती राजवटीमुळे PM मोदींनी तातडीने हस्तक्षेप करावा-पवार

बैठक सुरु असताना मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बोलवून घेतले

PM मोदी आणि पवार यांच्यातील बैठकीला सुरुवात

संसदेतील मोदींच्या कार्यालयात पवार दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...