भाजपला धक्का देत अहमद पटेलांनी राखली राज्यसभेची जागा

भाजपला धक्का देत अहमद पटेलांनी राखली राज्यसभेची जागा

सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी राज्यसभेची जागा राखण्यात यश मिळवलंय. केवळ एका मतानं त्यांचा विजय झालाय.

  • Share this:

09 आॅगस्ट : गुजरातमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसनं प्रतिष्ठेची लढाई जिंकलीय. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी राज्यसभेची जागा राखण्यात यश मिळवलंय. केवळ एका मतानं त्यांचा विजय झालाय.

मतफुटी, आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यानंतर मध्यरात्री एक वाजून 40 मिनिटांनी निकाल जाहीर झाला. अमित शहांना मतपत्रिका दाखवणाऱ्या दोन बंडखोर काँग्रेस आमदारांची मतं रद्द करण्यात आली. यामुळे अहमद पटेल यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला.

अमित शहा आणि स्मृती इराणीसुद्धा राज्यसभेत गेलेत. त्यांना प्रत्येकी 46 मतं मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 09:17 AM IST

ताज्या बातम्या