त्या भ्रष्ट 'दलाला'चं काँग्रेस नेत्याने घेतलं वकिलपत्र, पक्षाने केली हकालपट्टी

काँग्रेसने कितीही स्पष्टिकरण दिलं तरी यामुळं भाजपला आयतं कोलित मिळालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 5, 2018 11:13 PM IST

त्या भ्रष्ट 'दलाला'चं काँग्रेस नेत्याने घेतलं वकिलपत्र, पक्षाने केली हकालपट्टी

नवी दिल्ली, 5, डिसेंबर : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहे. युवक काँग्रेसच्याच एका नेत्याने पक्षाला अडचणीत आणलंय. या प्रकरणातला आरोपी ख्रिश्चन मिशेल याचं वकिलपत्र युवक काँग्रेसच्या लीगल सेलचा प्रमुख एके जोसफ  यानं घेतल्याचं उघड झालं. सोशल मीडियावर याची चर्चा झाल्यानं तातडीनं करवाई करत काँग्रेसनं त्याची त्या पदावरून हकालपट्टी तर केलीच त्याच बरोबर पक्षातूनही त्याला काढून टाकण्यात आल्याची घोषणा केली.


ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात मिशेल हा मध्यस्त होता. त्यानेच भारतात कंत्राट मिळविण्यासाठी पैसा पुरवल्याच आरोप आहे. सीबीआयने त्याला बुधवारी पहाटे दुबईहून भारतात आणलं होतं. दुपारी त्याला दिल्लीतल्या पातियाळा कोर्टात हजर करण्यात आलं. या मिशेलवरून काँग्रेसवर टीकेचा भडिमार होत असतानाच जोसेफ प्रकरण पुढं आलं.


मी केवळ एक वकिल म्हणून मिशेलचा खटला चालवणार आह. पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही असं जोसेफ यांनी स्पष्ट केलं. तर मिशेलचं वकिलपत्र घेताना पक्षाशी त्याने काहीही चर्चा केली नाही असं युवक काँग्रेसचे प्रवक्ते अमरीश रंजन पांडे यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसने कितीही स्पष्टिकरण दिलं तरी यामुळं भाजपला आयतं कोलित मिळालं आहे.

Loading...


पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल


प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ऑगस्टा वेस्ट लँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदीच्या घोटाळ्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, या भ्रष्टाचारातल्या दलालाला सीबीआयने ताब्यात घेतलंय.


तो दलाल आता गुपीतं उघडे करणार आहे. ही गुपीतं बाहेर आलीत तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची लक्तरं वेशीवर टांगली जातील. सीबीआयने या प्रकरणातला दलाल ख्रिस्टिन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेतलंय.

राजस्थानमधल्या सुमेरपूर इथं पंतप्रधानांची जाहीर सभा झाली.


या सभेत त्यांनी काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राहुल गांधी म्हणतात की मी भ्रष्टाचारावर बोलत नाही. काँग्रेस स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी असा आरोप करतेय. 2014 च्या निवडणुकीत मी वेस्ट लँडच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता आणि आता त्याच्या आरोपीला अटक केलीय. हाच दलाल राहुल गांधींच्या मित्रांना पैसा पुरवत होता असा थेट आरोप त्यांनी केला.


सोनिया गांधी यांच्या इन्कम टॅक्स प्रकरणात चौकशी करण्याची पवानगी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलीय. यातही मोठा घोटाळा गांधी कुटुंबाने केला आहे. कोर्टानं दिलेल्या जमीनावर सोनिया आणि राहुल गांधी बाहेर फिरत असून जामीनावर असलेल्या नेत्यांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का असा सवालही त्यांनी केला.


राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांची धड नावं घेता येत नाहीत. त्यांनी हातात कागद न घेता काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांची नावं म्हणून दाखवावीत असं आव्हान मी त्यांना देतो असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 11:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...