राज्यसभेत विरोधकांचा तुफान राडा, उपसभापतींसमोरील माइक तोडण्याचा प्रयत्न

राज्यसभेत विरोधकांचा तुफान राडा, उपसभापतींसमोरील माइक तोडण्याचा प्रयत्न

वादग्रस्त ठरलेले शेती विधेयक राज्यसभेत आज मांडण्यात आले. पण अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयकावरून जोरदार गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यसभेत कृषी मत्री नरेंद्र तोमर हे बोलायला उभे राहिले असता विरोधकांनी एकच गोंधळ घातला. सभापतींसमोर माईक तोडण्याचाही प्रयत्न झाला.

वादग्रस्त ठरलेले शेती विधेयक राज्यसभेत आज मांडण्यात आले. पण अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला.

राज्यसभेत सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून एकच वाद पेटला.  कृषी मंत्र्यांनी उद्या उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली. पण या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर देत आहे चर्चेला उत्तर देत आहे.

त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी राज्यसभेच्या सभापतींसमोरील माईकच तोडून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

राजकारणातली मोठी बातमी, IPS अधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न

दरम्यान, राज्यसभेतील संख्याबळ पाहता भाजपने सर्व खासदारांसाठी व्हीप काढला आहे. त्यामुळे सर्व खासदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

लोकसभेमध्ये शेतकरी विधेयक मांडण्यात आले होते. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. परंतु, राज्यसभेत भाजपकडे पुरेस बहुमत नसल्यामुळे संख्याबळाची जमवाजमव करावी लागणार आहे. राज्यसभेत अकाली दलाचे तीन सदस्य असून ते विधेयकाच्या विरोधात मतदान करतील.

संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक सवाल, मंत्र्यांनं अफवेमुळे राजीनामा दिला का?

विशेष म्हणजे, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घाईघाईने दोन विधेयके आणली व ‘शेतकऱ्यांच्या घरातून आता सोन्याचा धूर निघेल’ अशा थाटात ती संसदेत सादर केली तेव्हा स्फोट झाला. त्यामुळे अकाली दलाच्या केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी  राजीनामा दिला.  हरसिमरत कौर या मंत्रिमंडळातील अकाली दलाच्या प्रतिनिधी आहेत. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाई आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात बादल कुटुंबाने प्रथमच इतके मोठे पाऊल उचलले.

Published by: sachin Salve
First published: September 20, 2020, 1:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या