'गुरूजीं'नी शाळेला बनवलं मसाज पार्लर, रोज करून घ्यायचे मालिश

'गुरूजीं'नी शाळेला बनवलं मसाज पार्लर, रोज करून घ्यायचे मालिश

शिक्षणाच्या या मंदिराला मसाज पार्लर बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी माध्यमिक शाळेतल्या सहाय्यक शिक्षिकेचा एक व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

आगरा (उत्तर प्रदेश), 29 सप्टेंबर : शाळा हे शिक्षणाचं मंदिर आहे. प्रत्येक मुलं हे शाळेतून घडून मोठं होतं. पण शाळेत असा काही प्रकार सुरू होता की सगळ्यांनाच धक्का बसला. शिक्षणाच्या या मंदिराला मसाज पार्लर बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी माध्यमिक शाळेतल्या सहाय्यक शिक्षिकेचा एक व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शाळेतला विद्यार्थी एका शिक्षकाला डोक्याला मसाज देत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बीएसएने चौकशीचे आदेश दिले आहेत.

खरंतर, या व्हिडिओमध्ये शाळेत सहाय्यक शिक्षक मुन्नालाल हे वर्ग खुर्चीवर बसून शिकवण्याऐवजी मुलांकडून मसाज करून घेत आहेत. पालकांचा असा आरोप आहे की, बर्‍याचदा शिक्षक वर्गात अभ्यास घेण्याऐवजी मुलांना डोक्यावर मालिश करायला लावतात. या संदर्भात ग्रामस्थांनी शिक्षक मुन्नालाल यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या पण तरीदेखील शिक्षकामध्ये काही बदल झाला नाही.

शिक्षकाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालकांनी एसडीएमकडे तक्रार केली आहे. एसडीएम अरुण कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांशी अशा प्रकार वागणं हे अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

Published by: Renuka Dhaybar
First published: September 29, 2019, 5:41 PM IST
Tags: agra news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading