Home /News /national /

धक्कादायक! वडिलांनी केला 8 महिन्याच्या निष्पाप मुलीचा खून, जमिनीवर आपटून केलं ठार

धक्कादायक! वडिलांनी केला 8 महिन्याच्या निष्पाप मुलीचा खून, जमिनीवर आपटून केलं ठार

माया नावाच्या एका महिलेने याचवर्षी सुमारे 6 महिन्यांपूर्वी मनोजशी लग्न केलं होतं. माया ही विधवा होती आणि लग्नाआधी तिला दीड महिन्यांची एक मुलगीही होती.

    आग्रा, 26 ऑक्टोबर : आग्र्यामध्ये काळजाचा ठोका उडवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोज नावाच्या सावत्र वडिलाने 8 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बरं इतकंच नाही तर तिला जमिनीवर आपटून-आपटून मारलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे चिमुकलीला ठार मारल्यानंतर त्याने तिचा मृतदेह पुरला. मिळालेल्या माहितीनुसार, माया नावाच्या एका महिलेने याचवर्षी सुमारे 6 महिन्यांपूर्वी मनोजशी लग्न केलं होतं. माया ही विधवा होती आणि लग्नाआधी तिला दीड महिन्यांची एक मुलगीही होती. असा आरोप आहे की लग्न झाल्यापासून मनोजला त्याची सावत्र मुलगी आपल्याकडे ठेवण्याची इच्छा नव्हती. घरात मृत चिमुकलीवरून वारंवार वाद व्हायचा. त्यामुळे मनोजने तिला संपण्याचं धक्कादायक पाऊल उचललं. मुलीची हत्या करण्यासाठी मनोजला कुटुंबीयांनी दिली साथ पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, मनोज निर्दोष मुलीचा विनाकारण द्वेष करायचा. तो रोज तिला मारहाण करायचा. आपली मुलगी म्हणून त्याने तिला कधीच जीव लावला नाही. शेवटी त्याने तिला मारहाण करून तिची हत्या केली. या सगळ्या प्रकारामध्ये त्याच्या कुटुंबीयांनी त्याला साथ दिली. मुलीच्या मृत्यूनंतर संपूर्ण घर गावाबाहेर निघून गेलं आणि शेतात खूप खोल खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरला. आतापर्यंत 3 जणांना अटक... एसएसपी बबलू कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं आणि जमिनीत दफन केलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणात आरोपी मनोज आणि त्याच्या वडिलांसह 3 जणांना अटक करण्यात आली आहेत तर पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Agra news, Up crime news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या