Elec-widget

विश्वास बसणार नाही! आता पोलीसच करून देतील तुमचा मोबाईल रिचार्ज

विश्वास बसणार नाही! आता पोलीसच करून देतील तुमचा मोबाईल रिचार्ज

आता पोलीस करून देणारा तुमचा मोबाईल रिचार्ज, वाचा काय आहे प्रकरण.

  • Share this:

आग्रा, 19 नोव्हेंबर : एखाद्या केसचा छडा लावण्यासाठी पोलिसांना नागरिकांची गरज असते. सतर्क नागरिक पोलिसांसाठी फायद्याचे असतात, कारण त्यांच्यामुळे आरोपींना पकडण्यात मदत होते. त्याचबरोबर पोलिसांच्या मदतीला खबरीही असतात. खबरींचा वापरकरून पोलीस एखाद्या आरोपीचा मागोवा घेतात. त्यासाठी पोलीस खबरींशी कायम संपर्कात असतात. पण आता तुम्ही नागरिकही पोलिसांना मदत करू शकता, त्याबदल्यात पोलीस तुम्हाला मदत करतील.

पोलिसांकडे नेहमीच विविध ठिकाणांहून माहिती मिळत असते. कधीकधी मात्र काही नागरिक मस्करीसाठी म्हणून 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांची दिशाभूल करतात. मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी नवी आयडिया आणली आहे. पोलिसांना योग्य माहिती देणाऱ्यांचा फोन पोलीस रिचार्ज करून देणार आहेत. फक्त यासाठी तुम्हाला आग्र्याला रवाना व्हावे लागेल.

वाचा-2 मुलांचा आधार गेला, भर रस्त्यात पेट्रोल ओतून व्यक्तीची आत्महत्या

आग्राचे पोलीस अधिक्षक बबलू कुमार यांनी ही नवी युक्ती आणली आहे. त्यामुळे पोलिसांना योग्य सुचना आणि माहिती देणाऱ्या व्यक्तिचा फोन पोलीस रिचार्ज करून देतील. यासाठी आग्रा पोलिसांच्या वतीनं एक नंबरही जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर 9454458046 फोन किंवा मेसेज केल्यानंतर पोलीसांना योग्य माहिती मिळाल्यास लगेचच तुमचा फोनही रिचार्ज होईल.

वाचा-अजिंक्य रहाणेला पडतायत 'गुलाबी' स्वप्न, विराट-शिखर म्हणाले...

Loading...

बबलू कुमार यांच्या या कल्पनेला 4S असे नाव दिले आहे. यात समस्या, तक्रार, सुचना आणि तोडगा अशा चारचा समावेश आहे. पोलिसांना एखाद्या व्यक्तिकडून ही चार माहिती मिळाल्यास पोलीस त्याला लगेचच रिचार्ज करतील यासोबतच माहिती देणाऱ्या व्यक्तिला पोलिसांकडून प्रशस्तीपत्रही देण्यात येईल.

वाचा-वीर सावरकरांना भारतरत्न: केंद्र सरकारने केलं मोठ वक्तव्य!

आग्रा पोलिसांच्या मते याचा वापर पोलीस आपला नेटवर्क वाढवण्यासाठी करू शकतात. त्याचबरोबर पोलिसांना खोटी माहिती पोहचवणाऱ्यांवर आळा बसेल. तसेच, ज्या लोकांना पोलिसांना माहिती देण्याची भिती वाटते त्यांना प्रोत्साहन मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...