यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू!

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू!

उत्तर प्रदेशमधील युमना एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले.

  • Share this:

आग्रा, 08 जुलै: उत्तर प्रदेशमधील युमना एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक बस एत्मादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झरना नाल्यात कोसळली. बसने मार्गावरील रोलिंग तोडत 50 फुट खाली कोसळली. अपघातावेळी बसमधून 44 जण प्रवास करत होते. आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अपघातस्थळी बचाव कार्य सुरु आहे. नाल्यात पाणी असल्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही. ही बस लखनऊहून गाजियाबादकडे जात होती. अपघाताचे वृत्त कळताच डीएम आणि एसएसपी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एसएसपी बबलू कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार यमुना एक्स्प्रेसवरून ही बस दिल्लीच्या दिशेने जात होती. महामार्गावरील एका नाल्यात ही बस कोसळली. आतापर्यंत 17 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे.

बस चालकाचा डोळा लागल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता असल्याचे कुमार यांनी सांगितले. सध्या तरी बचाव कार्य सुरु आहे. आग्र्याचे जिल्हाधिकारी एन.जी.रवी कुमार यांनी 29 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नाल्यात पाणी असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मदत जाहीर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस कधी सुधारणार? अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर निरुपम आणि देवरांमध्ये वाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 08:20 AM IST

ताज्या बातम्या