मराठी बातम्या /बातम्या /देश /Agnipath: सिकंदराबाद हिंसाचाराच्या मास्टरमाईंडला अटक, WhatsApp नं जमवली होती गर्दी

Agnipath: सिकंदराबाद हिंसाचाराच्या मास्टरमाईंडला अटक, WhatsApp नं जमवली होती गर्दी

अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agnipath Scheme Protest) तेलंगनामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी झालेल्या हिंसाचारामागील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.

अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agnipath Scheme Protest) तेलंगनामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी झालेल्या हिंसाचारामागील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.

अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agnipath Scheme Protest) तेलंगनामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी झालेल्या हिंसाचारामागील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.

मुंबई, 19 जून : अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agnipath Scheme Protest) तेलंगनामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी झालेल्या हिंसाचारामागील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अवुला सुब्बा राव असं त्याचं नाव असून तो माजी सैनिक आहे. सुब्बा राव या हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिंकदराबाद रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात अनेक रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आली होती. त्यानंतर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात राकेश या तरूणाचा मृत्यू झाला होता.

एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार सुब्बा राव याने गर्दी जमवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. सिकंदराबादमध्ये झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेला सुब्बा राव हा आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून सैन्यात भर्ती होण्यासाठी ट्रेनिंग सेंटर चालवत आहे. नरसरावपेट, हैदराबादसह राज्यातील सात ठिकाणी त्याच्या ट्रेनिंग सेंटरच्या ब्रँच आहेत. पोलिसांनी त्याला चौकशीनंतर अटक केली आहे.

सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरील हिंसाचारात मृत्यू पावलेला राकेश वारंगल जिल्ह्यातील होता. या हिंसाचारामध्ये डझनभर लोकं जखमी झाले. शुक्रवारी हजारो आंदोलकांनी रेल्वे स्टेशन आणि रेल्वे प्रवाशांना लक्ष्य केले. त्यांनी रेल्वेच्या बोगीसह सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केले. या प्रकरणात पोलिसांनी अदोनी, कुरनूल, गुंटूर, नेल्लोर, विशाखापट्टणम आणि यलमांचिलीमधून अनेकांना ताब्यात घेतले आहे.

Agnipath Scheme : तरूणांना चिथावणी देणाऱ्या माजी सैनिकाला बेड्या, CCTV मध्ये सापडला पुरावा

दरम्यान तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राकेशच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी राकेशच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर राकेशच्या कुटंबातील योग्य सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा देखील केली आहे.

First published:

Tags: Indian army, Protest, Telangana