कर्नाटक सरकारमध्ये खळबळ; मुख्यमंत्र्यांच्या संपर्कातील 6 जणं पॉझिटिव्ह, 75 जणांना केलं आयसोलेट

कर्नाटक सरकारमध्ये खळबळ; मुख्यमंत्र्यांच्या संपर्कातील 6 जणं पॉझिटिव्ह, 75 जणांना केलं आयसोलेट

येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात 3 डेप्युटी CM, राज्यपाल, आपल्या मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यासह 10 आमदारांची भेट घेतली होती

  • Share this:

बंगळुरु, 4 ऑगस्ट : कर्नाटकात काही वरिष्ठ नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका आहे. ज्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामैया दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर तातडीने चाचण्या केल्या जात आहेत. येडियुरप्पा यांचे 6 कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 75 प्राथमिक संपर्क झालेल्यांचा तपास करण्यात आला आहे. या सर्वांची चाचणी करण्यात आली असून निकाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात 3 डेप्युटी CM, राज्यपाल, आपल्या मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यासह 10 आमदारांची भेट घेतली होती. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सर्व मंत्रिमंडळात धावाधाव सुरू झाली आहे. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांसह आमदारांचा समावेश आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 4, 2020, 5:27 PM IST

ताज्या बातम्या