म्हादई नदीच्या पाणी वाटपावरून उत्तर कर्नाटकात आंदोलन पेटलं,बंदला हिंसक वळण

कर्नाटक राज्यात पाण्याच्या प्रश्नावरून आता संघर्ष निर्माण झालाय.म्हादई नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा या मागणीसाठी आज उत्तर कर्नाटकमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 11:13 AM IST

म्हादई नदीच्या पाणी वाटपावरून उत्तर कर्नाटकात आंदोलन पेटलं,बंदला हिंसक वळण

27 डिसेंबर : कर्नाटक राज्यात पाण्याच्या प्रश्नावरून आता संघर्ष निर्माण झालाय.म्हादई नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा या मागणीसाठी आज उत्तर कर्नाटकमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे, त्यामुळे बेळगावसह संपूर्ण सीमाभागात आज हा बंद कडकडीत पाळण्यात आला आहे, पण अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं असून अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. तर रस्त्यांवर टायर पेटवून आंदोलकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या संघटना आणि शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून बेळगावसह खानापूर, चिक्कोडी , निप्पानी या भागांमध्ये शाळा आणि अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद पाळण्यात आला आहे. म्हादई नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न गोव्याबरोबर समझोता करून लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या बंदमुळे कर्नाटक राज्यातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

काय आहे म्हादई नदी प्रकरण?

1. ही नदी गोव्यातून कर्नाटकमध्ये येते.

2. या नदीचे पाणी मिळावे ही उत्तर कर्नाटकची मागणी.

Loading...

3. गोवा सरकारचा पाणी देण्यास विरोध, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार तर गोव्यात भाजपचे सरकार. पुढील 6 महिन्यात कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका

4. कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष एडियुरप्पा यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं.

5. सरकार आणि विरोधी भाजपनेही आश्वासन पळाले नाही म्हणून आंदोलन

6. आजच्या आंदोलनात शेतकरी संघटना सहभागी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...